मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मराठा आरक्षणावर होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे मोदी-ठाकरे यांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट मिळावी म्हणून पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली होती. पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती मान्य केली असून उद्धव ठाकरे यांना उद्या मंगळवारी भेटीची वेळी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्याशी मराठा आरक्षणावर चर्चा करतील. यावेळी आघाडी सरकारमधील काही मंत्री त्यांच्यासोबत असतील अशी माहिती सूत्रांनी दिली. विशेषत म्हणजे, भाजप खासदार संभाजीराजे यांना गेल्या वर्षभरापासून भेटीसाठी तात्काळत ठेवलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी वेळ काढणार आहेत.
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यामध्ये उद्या मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. या भेटीत केंद्र सरकारने काय केल्यास मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. तसेच घटनादुरुस्ती आणि मागासवर्ग आयोगाच्या अनुषंगानेही या भेटीत चर्चा करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मोदी-ठाकरे यांची पहिल्यांदाच भेट होत आहे. या भेटीतून मराठा आरक्षणावर मार्ग निघण्याची दाट शक्यता असल्याने त्याकडे संपूर्ण मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागलं आहे.
Read Also :
- ‘कोविडला निमंत्रण देणारी गर्दी चालणार नाही”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची काय लायकी राहिली असती
- “संभाजीराजे आता आमच्याच मागं येताय ना?”, मराठा आंदोलनाच्या घोषणेनंतर मेटेंची टीका
- …अन्यथा थेट जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करू; मुख्यमंत्र्यांचा इशारा
- भाजप सत्तेसाठी तळमळतोयं, आमदारांमध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण आहे – एकनाथ खडसे