मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. राज्यात देखील राजकीय पक्षांकडून लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. यातच देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीमार्फत मोठी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणुक आयोगाने देखील मोठी पाऊलं उचलली आहे.
हेही वाचा…“डायमंड उद्योग होतोय साफ, कुठं लपून बसलेत एक फुल दोन हाफ”, पटोलेंची जहरी टिका
लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी आहे. पात्र नवमतदारांनी नावनोंदणी करून मताधिकार बजाविण्याचे आवाहन मुख्य निवडणुक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे. यातच मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांच्या मतदान केंद्रांची यादी व पारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून मतदारांना त्याचे अवलोकन करून ९ डिसेंबरपर्यंत हरकती नोंदविण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्ह्याधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.
हेही वाचा…ललित पाटील प्रकरणात नाशिकचे माजी महापौर चौकशीच्या फेऱ्यात, पोलिसांनी पाठवलं समन्स
दरम्यान, यातच राज्य निवडणुक आयोगाने प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यात १० महिन्यांत १ लाख मतदार वाढले आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण ८० लाख ७३ हजार मतदारांची संख्या झाली आहे. प्रारूप मतदार यादीवर ९ डिसेंबरपर्यंत हरकती नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू केलीय. प्रारूप मतदार यादी निवडणूक आयोगाच्या www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलीय.
READ ALSO :
हेही वाचा…भुजबळांना धक्का देणारी बातमी, महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी कोर्टाने ‘ती’ याचिका फेटाळली
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्यांनी शरद पवारांचा हात धरला, पक्ष प्रवेशाने अजित पवार गटातही वाढली धाकधुक
हेही वाचा…मराठा समाजाचा दणका..! परभणीत तब्बल १५५ उमेदवार रिंगणात, निवडणुक आयोगाने रद्द केली निवडणुक
हेही वाचा…“आरक्षणाचा प्रश्न भाजपामुळेच चिघळला, फडणवीसांनी मराठा, धनगर व ओबीसी समाजाला फसवले,” पटोलेंचा हल्लाबोल
हेही वाचा…“मोदींच्या काळात भारतीयांवर १७३ लाख कोटी इतका कर्जाचा बोजा,” सुप्रिया सुळेंचा मोदींवर हल्लाबोल