मुंबई : राज्याच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाने शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. विरोधी पक्षाकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 50 खोके एकदम ओके, रोक घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो, आले रे आले गद्दार आले, अशी घोषणाबाजी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यावेळी केली. महाविकास आघीडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी शिंदे सरकारचा निषेध केला.
“राष्ट्रवादीवर आरोप करणाऱ्या अनेकांच्या फडणविसांनी सुरूवातीलाच मुसक्या आवळाल्या”
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आज विधानभवना बाहेर तुफान घोषणाबाजी केली आहे. संजय शिरसाठ यांना मंत्रिपद न देणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो, सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात चांगलं खात न देणाऱ्या या सरकराचा धिक्कार असो, आशिष शेलार यांना चुना लावणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो, अश्या घोषणा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी देत शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रिपदी विराजमान होताच सुधीर मुनगंटीवारांनी सर्व सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणा असा आदेश दिला. यावरून आज आधिवेशनाच्या सुरूवातीला विरोधी पक्षातील नेत्यांनी याविरोधीत जोरदार घोषणाबाजी केली. बोलायचं, वागायचं, खायचं हे स्वातंत्र्य आपल्याला भारताच्या संविधानाने दिलेलं आहे. कुणी रामराम घालावा, कुणी सलाम वालेकुम करावं, कुणी गुड मॉर्निंग म्हणावं, कुणी नमस्ते म्हणावं हा ज्याचा त्याचा आधिकार आहे. हे अधिकार कोणी हिसकावुन घेऊ शकत नाही. प्रत्येकाला हा अधिकार संविधानाने दिलेला आहे, असं राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी म्हणत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
“खातेवाटपात भाजपने शिंदेंवर लिंबू मिर्ची फिरवली?” शिवसेनेची भाजपवर जहरी टिका
ईडी सरकार हाय हाय म्हणत ईडीकडून राज्यातील विरोधीपक्षातील नेत्याची होणाऱ्या चौकशीवरून ही विरोधी पक्षाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याचसोबत राज्यात ओला दुष्काळ जाहीर न करणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो, शेकऱ्यांना मदत न करणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो, अशी देखील घोषणाबाजी विरोधीपक्षाकडून करण्यात आली.
Read also
- “हे बेईमानी सरकार आहे, ते लवकरच कोसळणार”, आदित्य ठाकरेंचं सुचक व्यक्तव्य
- मोहित कंबोज हा ब्रह्मज्ञान घेतलेला व्यक्ती आहे का ? इडीचा इशारा दिल्यानंतर राष्ट्रवादीचा सवाल
- “महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभणाऱ्या गोष्टी सध्या सुरूय” सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
- लाल किल्ल्यावरून मोदींनी सांगितली ‘पंचप्राणाची’ संकल्पना; वाचा सविस्तर
- आता ‘हॅलो’ नाही तर ‘वंदे मातरम्’ म्हणायचं; खाते वाटपानंतर सुधीर मुनगंटीवारांची मोठी घोषणा