मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून विधिमंडळात सुरूवात होत आहेत. अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर 50 खोके खोके असं म्हणत विरोधकांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. त्याआधीच भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीचा नेता लवकरच तुरूंगात जाणार आहे. असं सुचक वक्तव्य केलं आहे. त्यांचा रोख राज्याचे विरोधी पक्षनेता अजित पवार यांच्याकडे असल्याचं बोलण्यात येत आहे.
“खातेवाटपात भाजपने शिंदेंवर लिंबू मिर्ची फिरवली?” शिवसेनेची भाजपवर जहरी टिका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकर नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना भेटणार,” असे ट्विट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केले आहे. यामुळे, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार का? हे बघणे औत्स्युक्याचे ठरेल. त्यावरून मोहित कंबोज हा भाजपचा भोंगा आहे. तो काय पुर्णवेळ ईडीच्या कार्यालयात बसतो का याची कारवाई व्हायला हवी असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर टोला लगावला आहे.
“मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या गटाला मंत्रिमंडळात तोंडाला फक्त पाने पुसली”
गेल्या काही महिन्यात अजित पवार यांच्या संबंधित व्यक्ती आणि साखर कारखान्यांवर आयटीने धाड टाकली होती. त्यामुळे इतर राजकीय नेत्यांप्रमाणे अजित पवार देखील केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. त्याआधी गैरव्यवहार केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच नवाब मलिक यांच्या देखील इडीने कारवाई करत त्यांना तुरूंगात टाकण्यात आलं. त्यामुळे मोहित कंबोज यांचा रोख आता अजित पवार यांच्याकडेच असल्याचं बोलण्यात येत आहे.
नरेंद्र मोदींचा घराणेशाहीवर हल्लाबोल; लाल किल्ल्यावर मोदींचं दमदार भाषण
दरम्यान, मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्विटनंतर राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. मोहित कंबोज हा ब्रह्मज्ञान घेतलेला व्यक्ती आहे का. याला कसं माहिती पडतं की ईडी आणि सीबीआय कुठे कारवाई करणार आहे. हा ईडी कार्यालयात पुर्णवेळ बसणारा नेता आहे का, याचीही चौकशी झाली पाहिजे. मोहित कंबोज हा फक्त भाजपचा भोंगा आहे. त्याला दुसरं काहीही जमत नाही. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर चर्चा भरकटवण्याचा त्याचा हा प्रयत्न आहे. असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
Read also
- “महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभणाऱ्या गोष्टी सध्या सुरूय” सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
- लाल किल्ल्यावरून मोदींनी सांगितली ‘पंचप्राणाची’ संकल्पना; वाचा सविस्तर
- आता ‘हॅलो’ नाही तर ‘वंदे मातरम्’ म्हणायचं; खाते वाटपानंतर सुधीर मुनगंटीवारांची मोठी घोषणा
- “राष्ट्रवादीवर आरोप करणाऱ्या अनेकांच्या फडणविसांनी सुरूवातीलाच मुसक्या आवळाल्या”
- घराणेशाहीच्या वक्तव्यावर अजित पवारांचं मोदींना सडतोड प्रत्युत्तर, म्हणाले, “बळजबरीने पदावर बसलं तर..;”