पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील खाते वाटप करण्यात आले. यामध्ये महत्वाची खाती भाजपने घेतली असल्याची टिका आता विरोधी पक्षांकडून केली जात आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी खातेवाटपावरून शिंदे सरकारवर खोचक टिप्पणी केली आहे. शिंदे गटातील 10 तर भाजपचे 10 असे एकूण 20 मंत्र्यांना खाती सोपवण्यात आली आहेत.
“शहीद होऊन अमर तरी झाला असता बाळासाहेबांसाठी नाही तर आनंद दिघेंसाठी”
मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या गटाला मंत्रिमंडळात तोंडाला पाने पुसली आहेत. गृह, अर्थ, महसूल, वने, ग्रामविकास, सहकार,जलसंपदा व सर्व महत्त्वाची खाती भाजपाने आपल्याकडेच ठेवून शिंदे गटाला दुय्यम स्थान दिले आहे. शिंदे गटातील मंत्र्यांना मविआ सरकारमधे असलेला सन्मान आता कमी झाला? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. तर पुणे शहाराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, गद्दारी करताना राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करणाऱ्या अनेकांच्या फडणविसांनी सुरुवातीलाच मुसक्या आवळाल्या आहेत. अनेक मंत्री आज माजी मंत्री झालेत तर अनेकांच्या गळ्यात अडगाळीची खाती बांधण्यात आली आहेत. उर्वरीत गद्दारांनाही हळू हळू कर्माचे फळ मिळेल. एकनाथ शिंदेही अपवाद नसणार.
शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याचा फायदा! केंद्रात सेनेच्या ‘या’ दोन खासदारांना मिळणार मंत्रिपद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर ंकोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग देण्यात आलं आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती देण्यात आली आहे.
मला काय संजय राऊत समजलं का? अन् अमित ठाकरेंनी दाखवला ठाकरी बाणा
दरम्यान, आमच्या मंत्रिमंडळाचा छोटा विस्तार झाला आहे. त्यामुळे मंत्र्यांवर अधिकचा भार टाकण्यात आला आहे. अशाही परिस्थितीत मिळालेल्या खात्याला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढील विस्तार केल्यावर अधिकचे खाते दुसऱ्या मंत्र्याला दिले जाईल. खाते कुठले हे महत्त्वाचे नाही तर खाते चालवणारा व्यक्ती योग्य पाहिजे. आमच्यात खाते वाटपावरून कोणताही वाद नाही. त्यांना वाटलं तर आम्ही आमचे खाते त्यांना देऊ तसेच आम्हाला वाटलं तर आम्ही त्यांचे खाते मागून घेऊ. अन्यथा विस्तारात आमचे खाते आमच्या लोकांना मिळतील. तर त्यांचे खाते त्यांच्या लोकांना मिळतील मात्र, मंत्रिमंडळाचा पुढचा विस्तार कधी होईल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
Read also
- नरेंद्र मोदींचा घराणेशाहीवर हल्लाबोल; लाल किल्ल्यावर मोदींचं दमदार भाषण
- “अमृत महोत्सव अमृतासारखा असायला हवा, पण सध्या…;”; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा
- “बावनकुळे खुप मेहनती, त्यांनी बायको पळवून आणली”; गडकरींची जोरदार टोलेबाजी
- उद्योगनगरी तिरंगामय..! ‘हर घर तिरंगा’ संकल्पनेतून देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या प्रत्येकाचे स्मरण : महेश लांडगे
- “तर चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होतील”; गडकरींचं सुचक वक्तव्य