मुंबई : नवरात्र उत्साहात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारावाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सुट देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता नागरिकांना बारावाजेपर्यंत गरबावर नाचता येणार आहे.
माझा आई भवानीवर अन् न्यायालयावर विश्वास, लढाई आम्हीच जिंकू..! उद्धव ठाकरे
पर्यावरण व वातवरणीय बदल विभागाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ अन्वये वर्षामध्ये एकूण १५ दिवस निश्चित करुन सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट जाहीर करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडून १३ दिवस निश्चित करण्यात येतात. तसेच, २ दिवस हे जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीनुसार सूट देण्यासाठी राखीव ठेवण्यात येतात.
राऊतांना दिलासा नाहीच..! दसरा मेळाव्याचं भाषण ही तुरूंगातून पाहणार?
यावर्षी नवरात्रौत्सव उत्साहात साजरा करता यावा यासाठी १ ऑक्टोबर, २०२२ रोजी नवरात्रौत्सवासाठी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये यंदाच्या नवरात्रौत्सवासाठी सोमवार, ३ ऑक्टोबर आणि मंगळवार, ४ ऑक्टोबर या व्यतिरिक्त शनिवार, १ ऑक्टोबर हा आणखी एक वाढीव दिवस उपलब्ध होणार आहे.
Read also
- कोर्टात लढाई सुरू असताना काॅंग्रेस, भाजपच्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश; ठाकरेंचं बळ वाढलं
- मोठा ट्विस्ट..! उद्धव ठाकरेचं 2023 पर्यंत पक्षाचे अध्यक्ष, कोर्टात कागदपत्र सादर
- “शिंदेंनी पक्षाची फसवणुक केली, ते सेनेचे प्राथमिक सदस्य सुद्धा नाही”; कोर्टात ठाकरेंच्या वकिलांचा युक्तिवाद
- “कितीही अफजल खान आले तरी मी घाबरणार नाही”; ठाकरेंचा शहांवर अप्रत्यक्ष निशाणा
- “मंत्रालयातून संत गाडगेबाबांची” दशसुत्री शिंदे फडणवीस सरकारने हटविली”; राष्ट्रवादीची जहरी टिका