पुणे : भाजपच्या वतीने आज पुण्यातील बुधवार पेठेत सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत मुलींना कार्ड वाटप करण्यात आले. त्यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज बुधवार पेठेत आल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. तसेच त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टिप्पणी केली आहे. एबीपी माझाने दिलेल्या बातमीनुसार वेश्या व्यावसायाला प्रोफेशन म्हणून स्वीकारा असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
निवडणूक राज्यसभेची अन् चर्चा पुणे जिल्ह्यातील ‘या’ चार आमदारांची !
देवेंद्र फडणवीस यांच्यापाठीमागे सर्व जग उभं आहे. त्यामुळे आता विकासाचा राजकारण पुढे येत आहे आणि टोमणेबाजीच राजकारण मागे जात आहे. त्यामुळे आता जी राज्यसभेची निवडणुक झाली त्यात सर्वांची मोलाची भूमिका राहिली आहे. राज्यसभाच आपली झाली आहे तर आता विधान परिषेदबाबतही काही दुमत नाही. असंही त्या म्हणाल्या.
“केंद्रीय यंत्रणा तुमच्या कामी आल्या, 2024 ला हा हिशोब चुकता करू”; राष्ट्रवादीचा भाजपला इशारा
अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने वेश्या व्यवसायाला परवानगी दिली आहे. भारतीय संविधाननुसार आता वेश्यांनाही व्यवसाय करण्याचा अधिकार असून त्यांना त्यापासून कोणी रोखू शकत नाही. अशा प्रकारचा निर्णय दिला. त्याचबरोबर त्यांनी या निर्णयात काही अटी देखील घातल्या आहेत. मात्र या निर्णयामुळे देशातील एव्हाना राज्यातील अनेक वेश्या व्यवसाय करणाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
“चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरचा पैलवानच वाढदिवसानिमित्ताने भेट दिला”; देवेंद्र फडणवीस
दरम्यान, मागील काही दिवसापासून अमृता फडणवीस वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहिल्या आहेत. त्यांच्यावर समाज माध्यमांवरून जोरदार ट्रोलिंग होतंय. तरी देखील त्या राजकीय मत त्या बिनधास्तपणे व्यक्तव्य करीत आहे.
Read also:
- “मी पुन्हा येईन म्हणत फडणवीस ह्यांची पावलं पडली अन् विरोधकांची गढी डगमगली”; सदाभाऊ खोत
- “अनाजी पंतांनी काहीही केले तरी पुन्हा येता येणार नाही”; दिपाली सय्यदचा फडणवीसांना खोचक टोला
- “भाजपच्या विजयामुळे काहींचे चेहरे पडलेत, काही बावचाळलेत तर अनेक जण फिसाटले”; देवेंद्र फडणवीस
- “कोण फुटलं, का फुटलं.? आज ना उद्या ते कळेल”; राऊतांच्या आरोपांवर भोंडेंचं समर्थन
- “घोडेबाजारातील असतो तर अगोदरच विकलो गेलो असतो”; राऊतांना संजयमामांचं जोरदार प्रत्युत्तर