मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर आज पहाटे त्याचा निकाल लागला. यात खरी लढत ही शिवसेनेचे उमेदवार संजय पवार आणि भाजपचे नेते धनंजय महाडिक यांच्या होती. मात्र यात भाजपने धनंजय महाडिक यांच्या कपाळी विजयी टिळा लावला. त्यानंतर सत्ताधारी पक्षांकडून भाजपवर गंभीर आरोप लावले जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी भाजपवर खोचक टिप्पणी केली आहे.
“चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरचा पैलवानच वाढदिवसानिमित्ताने भेट दिला”; देवेंद्र फडणवीस
एका राज्यसभेने मुख्यमंत्री बनता येत नाही. त्याचबरोबर एका राज्यसभेने मुबंईचे महापौर तसेच कोल्हापुर पोटनिवडणुक जिंकतां येत नाही. १०६ काय १३० असुद्या पण अनाजी पंतांना महाराष्ट्र स्विकारणार नाही. काही केले तरी पुन्हा येता येणार नाही. जगातील मोठा पक्ष एका राज्यसभेवर होत नाही. असं म्हणत दिपाली सय्यद यांनी भाजपवर टिका केली आहे.
“लक्ष्मण जगताप यांनी दाखविलेली आश्वासक मुद्रा कधीच विसरू शकणार नाही”; देवेंद्र फडणवीस
आम्ही जिंकल्यानंतर अनेक लोकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. काहींचे चेहरे पडलेत तर काही नेते बावळचाळलेत तर काही लोक फिसाटले आहेत. परंतु आम्ही जिंकलो आहे. त्यामुळे जिंकल्याने नम्रता सोडायची नसते, असं म्हणत भाजपचे उमेदवार कोणामुळे जिंकले आहेत. हे सांगण्याची हिंमत त्यांच्याकडे नसून त्यांना सरकार टिकावायचं आहे. अपक्ष आमदारांना धमक्या देऊ काही होणार नाही. असा टोला देखील देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना लगावला.
“नुुपुर शर्मा प्रकरणात मोदी, शहा, योगींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा” ;अमोल मिटकरी
दरम्यान, नांदेडमधील लोडाचे अपक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे , अमरावतीमधील मोर्चीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आणि सोलापुरचे अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांच्यावर राऊतांनी गंभीर आरोप केले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष आमदार घोडेबाजारात विकले गेल्याने पराभवाचा सामाना करावा लागला असं संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊतांचे सर्व आरोप संजय मामा शिंदे यांनी फेटाळून लावले तर अपक्ष आमदार नरेंद्र भोंडे यांनी संजय राऊतांना याबाबत समर्थन दिले आहे.
Read also:
- “भाजपच्या विजयामुळे काहींचे चेहरे पडलेत, काही बावचाळलेत तर अनेक जण फिसाटले”; देवेंद्र फडणवीस
- “कोण फुटलं, का फुटलं.? आज ना उद्या ते कळेल”; राऊतांच्या आरोपांवर भोंडेंचं समर्थन
- “घोडेबाजारातील असतो तर अगोदरच विकलो गेलो असतो”; राऊतांना संजयमामांचं जोरदार प्रत्युत्तर
- निवडणूक राज्यसभेची अन् चर्चा पुणे जिल्ह्यातील ‘या’ चार आमदारांची !
- “केंद्रीय यंत्रणा तुमच्या कामी आल्या, 2024 ला हा हिशोब चुकता करू”; राष्ट्रवादीचा भाजपला इशारा