मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोक माझी सांगाती या पुस्तकाचे सुधारीत प्रकाशन मंगळवारी पार पडले. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोडत असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. यावरून सध्या राज्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून आज राष्ट्रवादीची यावरून बैठक होत असून यात दोन प्रस्ताव मांडले आहेत.
हेही वाचा…“उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्यने मुख्यमंत्री होण्याचे षडयंत्र रचले”
राष्ट्रवादीची आजची बैठक मुंबईत होत असून या बैठकीला अजित पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत दोन प्रस्ताव मांडले असून या बैठकीत राष्ट्रवादीचा अॅक्शन प्लॅन तयार केला जाणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी या बैठकीत दोन प्रस्ताव मांडले आहेत. शरद पवार यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर आणि शरद पवार यांनीच अध्यक्षपदी राहावं. असे प्रस्ताव प्रफुल्ल पटेल यांनी मांडले आहेत. त्यामुळे पुढे काय घडणार त्याची उस्तुकता आता सगळ्यांना लागून राहिली आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाचा शिंदे गटाला दणका, मंत्री संजय राठोडांचा उडवला धुरळा
पहिल्या प्रस्तावात शरद पवार यांनी आपल्या पदावर कायम राहावं, असा निर्णय सदस्य समिती देणार आहे, आणि या पहिल्या पस्तावाला शरद पवार तयार नसतील तर मग समिती दुसरा प्रस्ताव मांडणार आहे. दुसऱ्या प्रस्तावात एकमतानं राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नव्या अध्यक्ष म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांना समर्थन द्यावं असं समितीकडून सुचवण्यात येणार आहे.
हेही वाचा…‘मलाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यात रस’, आता आठवलेंचाही थेट दावा
दरम्यान, शरद पवार यांच्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळेंच्या व्यतिरिक्त इतर कोणाचंही नाव चर्चेत नाही. अशी माहिती मिळत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांना धक्का : हवेली बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचा ‘सुपडा साप’
हेही वाचा…‘आता लोकांची खात्री पटली, राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवली’
हेही वाचा…फॅक्ट चेक : निगडीतील शिवसृष्टीला तर महाविकास आघाडीच्या काळातच ‘खोडा’
हेही वाचा…शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवली! मोठी घोषणा करताच राष्ट्रवादीच्या नेत्यांना अश्रू अनावर
हेही वाचा…Big News: शरद पवार यांचा मोठा निर्णय, अध्यक्षपदावरुन निवृत्ती