केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांना देखील आता महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचे आहे. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री होण्यासाठी आपण इच्छुक असल्याचं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. याचवेळी रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्याची ऑफरही दिली आहे.
हेही वाचा… “..तेव्हा उद्धव ठाकरेंनी आमदारांना जाऊ दिलं”; दानवेंचा मोठा गौप्यस्फोट
सांगली येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, आजकाल प्रत्येकजण मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत आहे. मात्र, कुणाकडे बहुमत असेल तरच हे शक्य आहे. ते पुढे म्हणाले की, यावर बरीच चर्चा होत असल्याने. मला सांगायचे आहे की, ‘मलाही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे.
हेही वाचा… पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरेंची ठाकरे गटातून हकालपट्टी
ते पुढे म्हणाले, ‘अशी काही चर्चा झाली तर मी नक्कीच मुख्यमंत्री व्हायला तयार आहे. मात्र सध्या आमचे सरकार स्थिर असून एकनाथ शिंदे चांगले काम करत आहेत. ते दिवसाचे 16 ते 18 तास काम करतात. ते कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत.’ असं म्हणत आठवलेंनी मुख्यमंत्री शिंदेंचं बरंच कौतुक केलं.
Read also
हेही वाचा… धनंजय मुंडेंचा पंकजांना मोठा धक्का; अंबाजोगाईत ‘मविआ’चा दणदणीत विजय
हेही वाचा… “सोनिया गांधी म्हणजे विषकन्या, भरसभेत भाजपच्या नेत्याची जीभ घसरली”
हेही वाचा… शिवसेना भवन कुणाचे? ठाकरेंच्या संपत्तीवरील याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे मोठं पाऊल
हेही वाचा… अजितदादा सोबत येणार असतील तर…, शिवसेनेने घातली मोठी अट!