बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना मोठा धक्का दिला आहे. आंबाजोगाई बाजार समिती निवडणुकीमध्ये मुंडे बहिण भावाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. प्रचारावेळी एकोंमकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. अखेर आंबाजोगाई बाजार समिती निवडणुकीचा निकाल आता हाती आला आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला आहे.
हेही वाचा… पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरेंची ठाकरे गटातून हकालपट्टी
आंबाजोगाई बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये एकूण आठरा जागांपैकी तब्बल 15 जागांवर मविआनं बाजी मारली आहे. तर तीन जागांवर भाजपचा विजय झाला आहे. ही निवडणूक मविआच्या पॅनलने धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागल्यानं या निवडणुकीकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. अखेर निवडणुकीचा निकाल हाती आला असून, भाजपचा पराभव झाला आहे. हा पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का माणला जात आहे.
हेही वाचा… मोठा गौप्यस्फोट, शरद पवार यांच्या सांगण्यावरून संजय राऊत अजितदादा यांचा गेम करणार..!
दरम्यान, परळी बाजार समितीत धनंजय मुंडे यांचे 14 उमेदवार आघाडीवर आहेत. तर पंकजा मुंडे यांचा एकच उमदेवार आघाडीवर आहे. परळी बाजार समितीही धनंजय मुंडे यांच्या ताब्यात जात असल्याचं चित्र आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. दरम्यान, मतमोजणीच्यावेळी परळी मतमोजणी केंद्रावरील कर्मचऱ्यावर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी घेतला आक्षेप होता. उमेदवाराच्या ताब्यातील संस्थेत काम करणारा कर्मचारी प्रशासनाने मतमोजणीसाठी ठेवल्याचा आरोप करत आक्षेप घेण्यात आला होता. अखेर त्या मतमोजणी करणाऱ्या कर्मचऱ्याला हटवण्यात आल्यानंतर पुन्हा मतमोजणी सुरू झाली.
Read also
हेही वाचा… “सोनिया गांधी म्हणजे विषकन्या, भरसभेत भाजपच्या नेत्याची जीभ घसरली”
हेही वाचा… शिवसेना भवन कुणाचे? ठाकरेंच्या संपत्तीवरील याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे मोठं पाऊल
हेही वाचा… अजितदादा सोबत येणार असतील तर…, शिवसेनेने घातली मोठी अट!
हेही वाचा… “..तेव्हा उद्धव ठाकरेंनी आमदारांना जाऊ दिलं”; दानवेंचा मोठा गौप्यस्फोट