येत्या 10 मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपने मैदान मारण्यासाठी कंबर कसली आहे. दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहे. एकमेकांवर टीका केली जात असून एकमेकांचं वस्त्रहरण केलं जात आहे. एकमेकांवर आगपाखड करत असताना दोन्ही पक्षाच्या नेत्यांची जीभ घसरतानाही दिसत आहे.
हेही वाचा… मोठा गौप्यस्फोट, शरद पवार यांच्या सांगण्यावरून संजय राऊत अजितदादा यांचा गेम करणार..!
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साप म्हटलं. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपच्या आमदाराची जीभ घसरली. त्यानेही काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांदी यांना विषकन्या संबोधलं आहे.
हेही वाचा…पुण्यात शरद मोहोळ यांच्या पत्नीचा भाजपात प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ
भाजपचे आमदार बासनगौडा यांची कोप्पल येथे एक सभा होती. या सभेला संबोधित करताना त्यांनी सोनिया गांधी यांचा उल्लेख विषकन्या असा केला. संपूर्ण जगाने मोदींचं नेतृत्व मान्य केलं आहे. एकेकाळी जी अमेरिका मोदींना व्हिसा देण्यास नकार देत होती, त्याच अमेरिकेने मोदींना रेड कार्पेट अंथरले. मोदींचं स्वागत केलं. आता खरगे हे मोदींची तुलना कोबरा नागाशी करत आहेत. मोदी हे साप आहेत. ते जहर ओकतील असं म्हणत आहेत. पण तुम्ही ज्या पक्षात नाचत आहात त्या पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी या विषकन्या आहेत काय? असा सवाल बासनगौडा यांनी केला. सोनिया गांधी यांनी चीन आणि पाकिस्तानच्या एजेंट म्हणून काम केल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.
Read also
हेही वाचा… शिवसेना भवन कुणाचे? ठाकरेंच्या संपत्तीवरील याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे मोठं पाऊल
हेही वाचा… अजितदादा सोबत येणार असतील तर…, शिवसेनेने घातली मोठी अट!
हेही वाचा… “..तेव्हा उद्धव ठाकरेंनी आमदारांना जाऊ दिलं”; दानवेंचा मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा… पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरेंची ठाकरे गटातून हकालपट्टी