परभणी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेविरोधातली बंडाळीने शिवसेनेत मोठी फुट पडली. याचा मोठा फटका उद्धव ठाकरे यांना बसत आहे. यातच परभणीत पंचायत समितीच्या सभापतीसह चाळीस सरपंच, उपसरपंच यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा सोहळा मुंबई येथे पार पडला. तर दुसरीकडे ठाकरे गटात देखील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी, काॅंग्रेस, ठाकरे गट, अन् वचिंतचे कार्यकर्ते फोडले, शिंदेंच्या उपस्थितीत महाप्रवेश
बीड जिल्ह्यातील अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्याआधी हिंगोली, अमरावती, नाशिक येथील कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेनेवर प्रेम आणि विश्वास दाखवून तसेच शिवसैनिकांना सोबत घेऊन शिवसेना भगवा फडकविणार. असंही कार्यकर्त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटात सध्या राजकीय लढाई सुरू आहे. दोन्ही गटाने दाखल केलेल्या याचिकांवर सद्या सुनावणी सुरू आहे. यातच आगामी काही महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे अनेक कार्यकर्ते सध्या पक्षप्रवेश करतांना दिसत आहे.
Read also
- “भविष्यात साखर कारखान्यांना आर्थिकदृष्टया सक्षम होण्याची गरज”; शरद पवार
- “पिंपरी चिंचवडची पोटनिवडणुक राष्ट्रवादी लढवणार”, अजित पवारांनी दिले संकेत
- बल इंजिनंच सरकार विरोधकांना धडकी भरवणार..!
- अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ कृतीवर राष्ट्रवादीचा आक्षेप..! थेट फडणवीसांच्या बंगल्यात…
- राष्ट्रवादी, काॅंग्रेस, ठाकरे गट, अन् वचिंतचे कार्यकर्ते फोडले, शिंदेंच्या उपस्थितीत महाप्रवेश