मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या समाज माध्यमांवर नेहमी सक्रिय असतात. यातच एका व्हिडीओमुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या असून त्यांच्या या व्हिडीओबाबत राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे. यावर अद्यापही अमृता फडणवीस यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु यावरून त्या अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंच्या भेटीला, फडणवीसांकडून मुंडेंच्या प्रकृतीची विचारपुस
अमृता फडणवीस यांचा अलिकडेच आज मैने मुड बना लिया हा नवीन गाणं रिलीज झालं आहे. त्याच गाण्यावर त्या रियाजसोबत डान्स स्टेप्स करताना एका व्हिडीओ मध्ये दिसत आहेत. आता हा व्हिडीओ त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी बंगल्यावर शुट केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे यांनी केला आहे. तसेच हा व्हिडीओ शुट करण्यासाठी त्यांनी राज्याच्या सार्वजनिक कार्य विभागाची परवानगी घेतलीय की सांस्कृतिक मंत्रालयाची असा सवाल करत हेमा पिंपळे ह्यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे.
“सत्ताधारी आमचे शत्रू नाही..!”पार्थ पवार-शंभुराज देसाईंच्या भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसात अमृता फडणवीस यांचा आज मैने मुड बना लिया हे नवे गाणं रिलीज झालं. अवघ्या काहीच दिवसात ह्या गाण्याला मोठ्या प्रमाणात व्हिज मिळाले आहेत. याच गाण्याच्या संदर्भात त्या रिल्स बनवतांना व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यावरून त्यांच्यावर आता प्रंचड टिका केली जात आहे.
Read also
- राष्ट्रवादी, काॅंग्रेस, ठाकरे गट, अन् वचिंतचे कार्यकर्ते फोडले, शिंदेंच्या उपस्थितीत महाप्रवेश
- राष्ट्रवादी, काॅंग्रेस, ठाकरे गट, अन् वचिंतचे कार्यकर्ते फोडले, शिंदेंच्या उपस्थितीत महाप्रवेश
- “लक्ष्मण जगतापांबाबत लोकांमध्ये मोठी सहानुभूती”, चिंचवडची निवडणुक बिनविरोध व्हावी, राष्ट्रवादीची भूमिका
- “बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेला सुरूवात, न्याय मागणीला आपल्या सरकारने होकार द्यावा”; जितेंद्र आव्हाड
- चला आता पुन्हा कामाला लागा..! पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊतांना कोर्टात हजर राहण्याची नोटीस