पुणे : पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. त्यामुळे आता या जागेवर उमेदवारीवरून संभ्रम निर्माण झाला आहे. यातच राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी ही पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका घेतली आहे. तसेच लक्ष्मण जगताप यांच्याच कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
बाळासाहेबाच्या तैलचित्राचं अनावरण विधानसभेत, ठाकरे अन् शिंदे आमनेसामने येणार का ?
लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून पक्षासोबत काम केलं आहे. नगरसेवक, स्थायी समिती सभापती, महापौर, राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष, विधानपरिषद आमदार अशी विविध पद त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून सांभाळली आहे. तसेच जगताप यांचे सर्वपक्षीयांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. कार्यकर्त्यांचे मोठे जाळे होते. अंत्यविधीला मोठा जनसागर लोटला होता. त्यांच्या निधनामुळे जनसामान्यांच्यामध्ये जगताप परिवाराबाबत सहानुभूती आहे. त्यामुळे निवडणुक बिनविरोध होईल अशी शक्यता अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली आहे.
“आमदार थोरात हे भाची समजून आपल्या मागे उभे राहतील”; शुंभागी पाटलांचा विश्वास, काल गेटवरूनच परतल्या
पिंपरी चिंचवडमध्ये सध्या लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप अन् अश्विनी जगताप यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते राहुल कलाटे, अन् राष्ट्रवादीचे नेते नाना काटे, भाऊसाहेब भोईर हे देखील या पोटनिवडणुकीसाठी इच्छुक आहेत. यातच नाना काटे यांनी 2014 तर शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी 2019 मध्ये पिंपरी चिंचवड विधानसभेची निवडणुक लढविली होती. मात्र दोन्ही वेळेस दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी दोघांना धुळ चारली. आता याठिकाणी शंकर जगताप यांना भाजपकडून उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच याठिकाणी राष्ट्रवादीकडून नाना काटे यांच्या नावाचीही चाचपाणी सध्या सुरू आहे. त्यामुळे याठिकाणी ही पोटनिवडणुक बिनविरोध न होता थेट भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये होण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातही अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
निवडणुक आयोगासमोर ठाकरे अन् शिंदे गटाच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद , निर्णय काय?
पिंपरी चिंचवडमध्ये शंकर जगताप यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे किंवा नाना काटे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. याठिकाणीही भाजपला मोठी ताकद खर्च करावी लागणार आहे. यातच आगामी काळात महापालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. याचा अवधीही काही महिन्यांपुरता शिल्लक राहिला आहे. त्यामुळे भाजप अन् देवेंद्र फडणवीस या सगळ्यांमधून सोपा मार्गाला पंसती देणार. त्यामुळे ज्या पद्धतीने अंधेरीची पोटनिवडणुक सहानुभूतीच्या लाटेवर झाली तशाच मार्ग याठिकाणी देवेंद्र फडणीस स्विकारण्याची शक्यता असून पिंपरी चिंचवड मध्ये लक्ष्मण जगताप अन् कसबा पेठमधून मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना आपली उमेदवारी देऊन निवडणुक बिनविरोध करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
Read also
- “बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेला सुरूवात, न्याय मागणीला आपल्या सरकारने होकार द्यावा”; जितेंद्र आव्हाड
- चला आता पुन्हा कामाला लागा..! पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊतांना कोर्टात हजर राहण्याची नोटीस
- देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंच्या भेटीला, फडणवीसांकडून मुंडेंच्या प्रकृतीची विचारपुस
- “सत्ताधारी आमचे शत्रू नाही..!”पार्थ पवार-शंभुराज देसाईंच्या भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया
- पुण्यात भाजपचं ‘ऑपरेशन कमळ’ फुलणार..! काॅंग्रेस अन् राष्ट्रवादीचे 30 माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर