परभणी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेविरोधातली बंडाळीने शिवसेनेत मोठी फुट पडली. याचा मोठा फटका उद्धव ठाकरे यांना बसत आहे. यातच परभणीत पंचायत समितीच्या सभापतीसह चाळीस सरपंच, उपसरपंच यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा सोहळा मुंबई येथे पार पडला.
पुण्यात भाजपचं ‘ऑपरेशन कमळ’ फुलणार..! काॅंग्रेस अन् राष्ट्रवादीचे 30 माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर
मागील तीस वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादीची सर्वाधिक ताकद असलेल्या परभणीमध्ये चार पक्षांना खिंडार पडलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस, आणि वंचित बहुजन आघाडी या चार पक्षांना मोठा धक्का बसला आहे. पंचायत समितीच्या सभापतीसह चाळीस सरपंच, उपसरपंच यांनी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
बाळासाहेबाच्या तैलचित्राचं अनावरण विधानसभेत, ठाकरे अन् शिंदे आमनेसामने येणार का ?
परभणीच्या पाथरी येथील बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते सईद खान यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पाथरी आणि मानवत तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 16, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे 115, काॅंग्रेस 4 अपक्ष 4, वंचित बहुजन आघाडी एक अशा एकूण 40 जणांनी शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Read also
- “लक्ष्मण जगतापांबाबत लोकांमध्ये मोठी सहानुभूती”, चिंचवडची निवडणुक बिनविरोध व्हावी, राष्ट्रवादीची भूमिका
- “बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेला सुरूवात, न्याय मागणीला आपल्या सरकारने होकार द्यावा”; जितेंद्र आव्हाड
- चला आता पुन्हा कामाला लागा..! पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊतांना कोर्टात हजर राहण्याची नोटीस
- देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंच्या भेटीला, फडणवीसांकडून मुंडेंच्या प्रकृतीची विचारपुस
- “सत्ताधारी आमचे शत्रू नाही..!”पार्थ पवार-शंभुराज देसाईंच्या भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया