मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काल एमपीएसीमध्ये इतिहासातील सर्वात मोठी जाहीरात काढली आहे. महाराष्ट्र आयोगामार्फत जवळपास 8 हजार 169 जागांची भर्ती काढली असून त्यासाठी 25 जानेवारी 2023 ते 14 फेब्रुवारी 2023 पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. यावरून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी यावर विरोधकांना एक खोचक टोला हाणला आहे.
चला आता पुन्हा कामाला लागा..! पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊतांना कोर्टात हजर राहण्याची नोटीस
डबल इंजिनंच सरकार विरोधकांना धडकी भरवणार..! महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी नं तब्बल 8 हजार 169 जागा भरण्यासाठी जाहिरात काढली आहे. आयोगाच्या वेबसाईटवर जाहिरातही प्रसिद्ध झाली आहे. विद्यार्थ्यांनो, स्पर्धा परिक्षेची तयारी सुरू करा. अस चंद्रकांत पाटलांनी ट्विट करत विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंच्या भेटीला, फडणवीसांकडून मुंडेंच्या प्रकृतीची विचारपुस
मुंबईच्या सभेत नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डबल इंजिन सरकारचा उल्लेख केला होता. तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आपण मुंबईचा विकास झपाट्याने करू शकतो. असं वक्तव्य देखील त्या जाहीर सभेत केलं होतं. त्यावरून चंद्रकांत पाटलांनी यावर भाष्य केलंय.
“सत्ताधारी आमचे शत्रू नाही..!”पार्थ पवार-शंभुराज देसाईंच्या भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया
रेल्वेला आधुनिक बनवण्यासाठी मिशन मोडवर काम सुरू आहे. यात मुंबई लोकल आणि अन्य रेल्वे पायाभूत सुविधांचाही विकास केला जाणार आहे. मुंबईच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थेची भूमिका खुप मोठी आहे, म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी BMC चा बिगुल फुंकला. तसेच मुंबईचा कायापालट करण्याची सुरवात झाली आहे. देशातल्या प्रत्येक शहारामध्ये मल्टिमो़डल कनेक्टिव्हिटी उभारणार अनेक पायाभूत प्रकल्प मुंबईला नवं सामथ्य देत आहेत. असंही ते म्हणाले.
डबल इंजिनचं सरकार
विरोधकांना धडकी भरवणार!
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात #MPSC नं तब्बल 8 हजार 169 जागा भरण्यासाठी जाहिरात काढली आहे.
आयोगाच्या वेबसाइटवर जाहिरातही प्रसिद्ध झाली आहे.
विद्यार्थ्यांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करा!
धन्यवाद, @mieknathshinde जी, @Dev_Fadnavisजी! pic.twitter.com/KZjHujgKX4— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 21, 2023
Read also
- अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ कृतीवर राष्ट्रवादीचा आक्षेप..! थेट फडणवीसांच्या बंगल्यात…
- राष्ट्रवादी, काॅंग्रेस, ठाकरे गट, अन् वचिंतचे कार्यकर्ते फोडले, शिंदेंच्या उपस्थितीत महाप्रवेश
- राष्ट्रवादी, काॅंग्रेस, ठाकरे गट, अन् वचिंतचे कार्यकर्ते फोडले, शिंदेंच्या उपस्थितीत महाप्रवेश
- “लक्ष्मण जगतापांबाबत लोकांमध्ये मोठी सहानुभूती”, चिंचवडची निवडणुक बिनविरोध व्हावी, राष्ट्रवादीची भूमिका
- “बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेला सुरूवात, न्याय मागणीला आपल्या सरकारने होकार द्यावा”; जितेंद्र आव्हाड