नागपूर : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने काँग्रेस नेते आणि नागपुरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट दिली. नितीन राऊत यांच्या नागपूर येथील बेझनबाग निवासस्थानी संजयने संपूर्ण कुटुंबाची भेट घेतली.
नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत याचा 21 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित विवाह स्वागत समारंभ कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द झाला होता. त्यामुळे इतरांना लग्नासाठी उपस्थित राहता आले नव्हते. याच पार्श्वभूमीवर संजय दत्तने त्यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली.
अभिनेता संजय दत्त याने नागपुरात नवदाम्पत्य कुणाल आणि आकांक्षा यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. संजय दत्तची ही नागपूर भेट अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती.
दरम्यान, नितीन राऊत यांचे चिरंजीव कुणालचा विवाह 19 फेब्रुवारीला संपन्न झाला. मात्र, नागपुरातील कोरोनाची वाढती स्थितीमुळे 21 फेब्रुवारीला आयोजित विवाह स्वागत समारंभ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
Read Also :
- माध्यमांमध्ये जेवढी छाननी आमच्या सरकारची व्हायची, तेवढी आता होत नाही!
- ‘राऊतांच्या धमक्यांना घाबरलो, मला आता पोलीस संरक्षण द्यावे लागेल’
- पुणे उद्यापासून ‘अनलॉक’, जाणून घ्या काय सुरु, काय बंद?
- ‘मराठा समाजच अशोक चव्हाणांचा राजीनामा मागेल, भाजप मागणार नाही’
- ‘नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षण का दिले नाही?’