पुणे : मराठा आंदोलकांव्यतिरिक्त जाळपोळीच्या घटनेत २१ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. माझ्या कार्यालय, घराचं पुर्ण नुकसान झालं असून अद्यापही पोलिसांमध्ये तक्रार केलेली नाही. घटना घडत असतांना पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केला आहे. बीड जिल्ह्यात झालेल्या जाळपोळीच्या घटनेत प्रकाश सोळंके यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यावर त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. यावरून आता खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिकास्त्र सोडलंय.
हेही वाचा…रेव्ह पार्ट्या आयोजित करणाऱ्या ‘एल्विस यादवा’ला पोलिसांनी घातल्या बेड्या, शिंदे-फडणवीसांवर काॅंग्रेसची जहरी टिका
राज्य सरकारला पाठिंबा देणारे आमदार स्वतः सांगत आहेत, त्यांच्या घरावर झालेला हल्ला पुर्वनियोजित होता. हल्लेखोरांकडे हत्यारे, पेट्रोलबॉम्ब, दगड आदी होते. या संपूर्ण घटनाक्रमात पोलीसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली असेही त्यांचे म्हणणे आहे. ते गृहखाते आणि गृहमंत्री महोदयांचे अपयश अधोरेखित करीत आहेत. असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी डेडलाईन २४ डिसेंबर की २ जानेवारी, घोळ कायम, शिष्टमंडळ पुन्हा भेटणार
दरम्यान, पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, जर या राज्यात सत्ताधारी आमदारांचीही घरे सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय हा प्रश्न आहे. राज्याचे गृहमंत्री सपशेल अपयशी ठरलेत आणि त्यांना गृहखाते झेपत नाही याचा हा आणखी मोठा पुरावा आहे. मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने गृहमंत्र्यांचा राजीनामा घेऊन त्यांना छत्तीसगडमध्ये प्रचारासाठी मोकळे करावे.
राज्य सरकारला पाठिंबा देणारे आमदार स्वतः सांगत आहेत त्यांच्या घरावर झालेला हल्ला पुर्वनियोजित होता.हल्लेखोरांकडे हत्यारे, पेट्रोलबॉम्ब, दगड आदी होते. या संपूर्ण घटनाक्रमात पोलीसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली असेही त्यांचे म्हणणे आहे. ते गृहखाते आणि गृहमंत्री महोदयांचे अपयश… https://t.co/va6uibDAAH
— Supriya Sule (@supriya_sule) November 3, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“प्रकाश सोळंकेंना फोनाफोनी करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, त्याच फोनमुळे बंगला अन् गाड्या पेटवल्या
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विश यादव सारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट”, वडेट्टीवारांचा हल्लाबोल
हेही वाचा…“खासदार सुनिल तटकरे यांना तात्काळ निलंबित करा,’ सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मोठी मागणी
“कितीही वेळा हिनवून ही तुम्हीच मराठा आरक्षणाचा वजीर आहात”, अन् फडणवीसांसाठी आमदार सरसावले
हेही वाचा…रेव्ह पार्ट्या आयोजित करणाऱ्या ‘एल्विस यादवा’ला पोलिसांनी घातल्या बेड्या, शिंदे-फडणवीसांवर काॅंग्रेसची जहरी टिका