बीड : मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असतांना राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर बीड जिल्ह्यात काही अज्ञातांकडून प्रकाश सोळंके यांचा बंगला आणि गाड्या पेटवून देण्यात आल्या. त्यानंतर जिल्ह्यात हिसंक घटना घडल्या. यावरून आता प्रकाश सोळंके यांना फोन करणारा पोलिसांच्या ताब्यात आला आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी डेडलाईन २४ डिसेंबर की २ जानेवारी, घोळ कायम, शिष्टमंडळ पुन्हा भेटणार
मराठा आरक्षणाची मागणी होत असतांना सुंदर भोसले यांनी प्रकाश सोळंके यांना फोन केला होता. यावेळी सुंदर भोसले यांनी प्रकाश सोळंके यांना मराठा आरक्षणावरून राजीनामा देण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टातील काही कायदेशीरबाबी सोळंके यांनी समजून सांगत लगेच आरक्षण देता येत नसल्याचं सोळंकेंनी सांगितलं. हा संवाद पुढे मग वाढतच गेला. त्यानंतर प्रकाश सोळंके यांची ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली.
हेही वाचा…“कायद्याच्या चौकटीतले टिकणारे आरक्षण मराठा समाजाला देणार”, एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला दिला शब्द
दरम्यान, प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. त्यानंतर आंदोलकांनी बंगल्यासह गाड्यांची जाळपोळ केली. तर राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या बंगल्यासह काही हॉटेलही जाळण्यात आलीत. यावरून बीड जिल्ह्यात मोठा हिंसाचार झाला. त्यावर आता पोलिसांनी कारवाई करत माजलगाव येथील घरातून सुंदर भोसलेला अटक करण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विश यादव सारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट”, वडेट्टीवारांचा हल्लाबोल
हेही वाचा…“खासदार सुनिल तटकरे यांना तात्काळ निलंबित करा,’ सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मोठी मागणी
“कितीही वेळा हिनवून ही तुम्हीच मराठा आरक्षणाचा वजीर आहात”, अन् फडणवीसांसाठी आमदार सरसावले
हेही वाचा…रेव्ह पार्ट्या आयोजित करणाऱ्या ‘एल्विस यादवा’ला पोलिसांनी घातल्या बेड्या, शिंदे-फडणवीसांवर काॅंग्रेसची जहरी टिका
हेही वाचा…रेव्ह पार्ट्या आयोजित करणाऱ्या ‘एल्विस यादवा’ला पोलिसांनी घातल्या बेड्या, शिंदे-फडणवीसांवर काॅंग्रेसची जहरी टिका