मुंबई : बिग बॉस २ चे विजेते आणि युट्युबर एल्विश यादव यांच्यासह त्याच्या साथीदारांविरोधात रेव्हा पार्टी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नोएडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. तसेच नोएडा आणि एनसीआरच्या फार्म हाऊसवर जिवंत सांपासह व्हिडीओ शुट केल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला आहे. याच एल्विश यादव सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे फोटो ट्विट करत काॅंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी टिका केली आहे.
हेही वाचा…निवृत्त न्यायमूर्तींना मनोज जरांगे पाटलांनी केले कडक सवाल? मराठ्यांना आरक्षण मिळणार का ?
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ झाले आहे का ? असा सवाल करत एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात विषारी सापांच्या विषाच्या रेव्ह पार्ट्या आयोजित करणाऱ्या एल्विस यादव सारख्या टुकार युट्युबरला विशेष आमंत्रण देऊन गणपती आरतीला बोलावले होते. असं अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“मराठ्यांना आरक्षण नक्कीच मिळणार, परंतु त्यासाठी..,” निवृत्त न्यायमूर्तींच्या माध्यमांतून जरांगे पाटलांशी चर्चा
तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की, आता नोएडा पोलिसांनी विषारी रेव्ह पार्टी आयोजित केल्याप्रकरणी एल्वीस यादव व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा नोंद केला असून त्यांच्याकडे जिवंत विषारी साप सापडले आहेत. यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुण्यातील कुख्यात गुंड बाबा बोडकेंचे वर्षा बंगल्यावरील फोटो आले होते. अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा खोचक सवालही त्यांनी केलाय.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ झाले आहे का ?
एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात विषारी सापांच्या विषाच्या रेव्ह पार्ट्या आयोजित करणा-या एल्वीस यादव सारख्या टुकार युट्युबरला विशेष आमंत्रण देऊन गणपती आरतीला बोलावले होते.
आता नोएडा पोलिसांनी… pic.twitter.com/YHss2tSGhG
— Atul Londhe Patil (@atullondhe) November 3, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी डेडलाईन २४ डिसेंबर की २ जानेवारी, घोळ कायम, शिष्टमंडळ पुन्हा भेटणार
हेही वाचा…“कायद्याच्या चौकटीतले टिकणारे आरक्षण मराठा समाजाला देणार”, एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला दिला शब्द
हेही वाचा…“अखेर मनोज जरांगे यांचं उपोषण मागे !” देवेंद्र फडणवीसांनी दिली पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा…“तब्बल ९ दिवस अन्नशिवाय उपोषण,” मनोज जरांगे पाटलांच्या आरोग्यविषयी आली मोठी माहिती
हेही वाचा…“अजित पवार गटात गेलेला शरद पवारांचा शिलेदार पुन्हा परतला, जोरदार स्वागत करत दिला प्रवेश