मुंबई : आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अनेक जण पक्ष प्रवेश करतांना दिसत आहेत. यातच राज्यात झालेल्या पक्ष फुटीनंतर अनेक नेत्यांनी पक्ष प्रवेश केला आहे. यातच आता राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुरूवातीला अजित पवार गटात गेलेल्या नेत्याने पुन्हा शरद पवार गटात येण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा…“मराठ्यांनी मला वाचवलं, हल्ला करणारे दुसरेच ,”आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितली सगळी हकीकत
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्या उपस्थितीत आज पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पनवेल शहर माजी जिल्ह्याध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सतीश पाटील यांना अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत पुन्हा शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांचा जयंत पाटलांनी पक्षात स्वागत केलं आहे. यावेळी, प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, महिला प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर, प्रभारी जिल्हाध्यक्ष पनवेल शहर प्रमोद बागल, जिल्हा सरचिटणीस आनंद भिंगार्डे, युवक जिल्हाध्यक्ष शैबाज पटेल आणि अश्फाक पटेल उपस्थित होते.
हेही वाचा…विधानभवनात व्हीपवरून ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये खडाजंगी, आजच्या सुनावणीत मोठा ट्विविस्ट
दरम्यान, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात संजय पाटील दुधगावकर यांची जयंत पाटील यांनी धाराशिव प्रभारी जिल्ह्याध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. तर दुसरीकडे बाप्पा सावंत यांची अजित पवार गटात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष आमदार माननीय श्री. जयंतराव पाटील यांची भेट घेवून साहेबांच्या आशिर्वादाने आणि प्रातांध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहर माजी जिल्हाध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री.… pic.twitter.com/RoBElgk26N
— NCP (@NCPspeaks) November 2, 2023
READ ALSO :
हेही वाचा…निवृत्त न्यायमूर्तींना मनोज जरांगे पाटलांनी केले कडक सवाल? मराठ्यांना आरक्षण मिळणार का ?
हेही वाचा…“मराठ्यांना आरक्षण नक्कीच मिळणार, परंतु त्यासाठी..,” निवृत्त न्यायमूर्तींच्या माध्यमांतून जरांगे पाटलांशी चर्चा
हेही वाचा…मराठा आंदोलनाची धग कायम, राज्यात आज काय काय घडलं ?
हेही वाचा…नितेश राणेंचं पोस्टर गाढवाला लावून दिलं आव्हान, मराठा समाज राणेंच्या विरोधात आक्रमक
हेही वाचा…शिवसेना १६ अपात्र आमदारांवरील सुनावणी संपली, आता ‘या’ तारखेला होणार पुढची सुनावणी