बीड : मराठा आरक्षणावरून जिल्ह्यात राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर सुरूवातीला दगडफेक अन् त्यानंतर गाड्या पेटवून दिल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर जिल्ह्यात आमदार जयदत्त क्षीरसागर यांचा बंगला तसेच हॉटेल देखील पेटवून देण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी आता अनेकांना ताब्यात घेतलं आहे. तर जिल्ह्यात संचारबंदी देखील लागू करण्यात आली. यावर आता प्रकाश सोळंके यांनी मोठे गौप्यस्फोट केले आहेत.
हेही वाचा…“सत्तेत असणारे आमदार आंदोलन करतात म्हणजे.., रोहित पवारांनी व्यक्त केली ‘ती’ शंका
माझ्या बंगल्यासमोर जो जमाव आला होता. त्यामध्ये मराठा समाजाशिवाय इतरही माणसं होती. यामध्ये अवैध धंदे करणारे, वाळू, गुटखा, हातभट्टी धान्याचा काळा बाजार करणारे लोकांचाही समावेश होता. यातच माझे ३० ते ३५ वर्षापासूनच्या राजकीय विरोधकांचे कार्यकर्ते देखील यामध्ये दिसत होते. यामध्ये जवळपास २०० ते २५० लोकांनी पुर्वनियोजित कट करून हल्ला केला. मात्र या हल्ल्यात मला मराठा बांधवांनी वाचवलं असं प्रकाश सोळंके यांनी सांगितलं.
हेही वाचा…पोलिस यंत्रणा ‘ॲक्टिव्ह मोड’ वर, जाळपोळीच्या घटनांवरून १० मराठा आंदोलकांना पोलिसांनी केली अटक
अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यात ती गाड्या जाळल्या गेल्या असून मला भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांच्याही गाड्या जाळण्यात आल्या. तसेच सात-आठ मोटरसायकल तसेच यात पोलिसांच्या गाड्याही होत्या. फक्त दगडफेक, जाळपोळ नाहीतर माझ्या जिवीतालाही हानी पोहचावी या दृष्टीने जमाव आला होता. त्यासंदर्भात सीसीटिव्ही फुटेज पाहिले असता २०० ते २५० जण दगडफेक करीत होते. इतर आंदोलक या दगडफेकीला विरोध करत होते. ज्यांनी माझा जीव वाचवला ते सुद्धा मराठा समाजाचेच कार्यकर्ते होते. तसेच त्यांनी मला संरक्षणही दिले. असंही प्रकाश सोळंके यांनी म्हटलेय.
हेही वाचा…मंत्रालयाबाहेर आमदारांचा चक्काजाम आंदोलन, पोलिसांकडून आमदारांची धरपकड
दरम्यान, या सर्व घटनेसंदर्भात पोलिसांना सीसीटिव्ही फुटेज दिले आहेत. त्यामध्ये समाजकंटक, माझा राजकीय विरोध करणारे यामध्ये स्पष्टपणे दिसत आहेत. यामध्ये सरसकट सर्वांना अटक न करता तुम्हाला कॅमेऱ्यात दगडफेक करताना जे दिसत आहेत. त्यानाच अटक करण्याची विनंती पोलिसांनी केली असल्याचंही प्रकाश सोळंके यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…विधानभवनात व्हीपवरून ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये खडाजंगी, आजच्या सुनावणीत मोठा ट्विविस्ट
हेही वाचा…“सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे,” मिटकरींच्या भूमिकेनंतर पक्षात वाद होण्याची शक्यता ?
हेही वाचा…“राज्य सरकारने मराठ्यांसोबत मुस्लिम समाजालाही आरक्षण द्यावे,” महाराष्ट्रातील ‘या’ आमदाराने केली मागणी
हेही वाचा…““मराठा समाज हा काय पाकिस्तान, अमेरिकेतला,”? मराठा आरक्षणाबाबत बच्चू कडूंचा संतप्त सवाल
हेही वाचा…‘क्या हार में क्या जीत मैं,’ निलेश राणेंच्या स्वागतासाठी जोरदार बॅनरबाजी, आज शक्तीप्रदर्शन करणार