मुंबई : मराठा आरक्षणासाठी राज्यात आंदोलन केलं जात आहे. यातच यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यात आम्हाला बोलवण्यात आलं नाही. मराठा आरक्षणासाठी आमचा पाठिंबा आहे. परंतु मराठा आरक्षणासोबत मुस्लिम समाजाला देखील आरक्षण देण्यात यावे, कारण अनेक समित्याच्या अहवालानुसार मुस्लिम समाज हा मागासलेला आहे. मराठा समाजाला देखील आरक्षण देण्यात यावे, त्यासोबत मुस्लिमांना देखील ५ टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी आमदार वासिर पठाण यांनी केली आहे.
हेही वाचा…“..म्हणून अजित पवारांच्या विरोधातील मराठा मोर्चाचे निषेध आंदोलन केले रद्द”
पुढे बोलतांना ते म्हणाले की, २०१४ च्या अगोदर शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात आले. परंतु त्याचा पुर्णपणे कायदा बनवला नाही. त्याची अंमलबजावणी देखील झाली नाही. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. त्याठिकाणी मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण शिक्षणामध्ये दिले पाहिजे. परंतु यावर कानडोळा करण्यात आला. विधानसभेत देखील मराठा समाजाला आरक्षण द्या, परंतु त्यासोबत मुस्लिमांना देखील ५ टक्के आरक्षण देण्याची मागणी केली.
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र होणार? आज विधानभवनात काय काय घडणार ?
दरम्यान, मागील काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. आज राज्य सरकाराचं शिष्ठमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अतंरसराठी गावात दाखल झाले आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आपलं उपोषण मागे घेणार का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…““मराठा समाज हा काय पाकिस्तान, अमेरिकेतला,”? मराठा आरक्षणाबाबत बच्चू कडूंचा संतप्त सवाल
हेही वाचा…‘क्या हार में क्या जीत मैं,’ निलेश राणेंच्या स्वागतासाठी जोरदार बॅनरबाजी, आज शक्तीप्रदर्शन करणार
हेही वाचा…“सत्तेत असणारे आमदार आंदोलन करतात म्हणजे.., रोहित पवारांनी व्यक्त केली ‘ती’ शंका
हेही वाचा…पोलिस यंत्रणा ‘ॲक्टिव्ह मोड’ वर, जाळपोळीच्या घटनांवरून १० मराठा आंदोलकांना पोलिसांनी केली अटक
हेही वाचा…मंत्रालयाबाहेर आमदारांचा चक्काजाम आंदोलन, पोलिसांकडून आमदारांची धरपकड