मुंबई : मागील वर्षापासून प्रलंबित असलेल्या शिवसेना अपात्र आमदारांबाबत आज सुनावणी होणार आहे. विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता नार्वेकर शिवसेना अपात्र आमदारांवरील याचिकेवर काय निर्णय देणार? त्याकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक संपन्न, शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
शिवसेना अपात्र आमदार याचिकेवर निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्ष टाळाटाळ करीत असल्याची तक्रार ठाकरे गटाने कोर्टात दाखल केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायधीशांनी राहुल नार्वेकर यांना जोरदार फटकारत या प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी घ्यावी, असे आदेश दिले होते.
हेही वाचा…“आपल्या भावाचा राग देवेंद्र फडणवीसांवर काढू नका”,सुळेंना चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
दरम्यान, शिवसेनेकडून दाखल केलेल्या ३४ याचिकांचं सहा गटात वर्गीकरण करण्यात आलं आहे. यातील प्रमुख याचिकांवर आज एक वाजता विधानभवनात सुनावणी होणार आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले असून केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“जरांगे पाटलांच्या जीवाचं बरंवाईट झालं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही”, कुणी दिला इशारा ?
हेही वाचा…राज्याचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीला, ‘त्या’ पत्रात कोणत्या गोष्टी असणार ?
हेही वाचा…राज्यात मराठा आरक्षण गाजत असतांना अनेकांनी हाताला बांधलं घड्याळ, मुंबईत पार पडला पक्ष प्रवेश सोहळा
हेही वाचा…अजित पवार गटाच्या नेत्यासाठी सुप्रिया सुळे धावल्या, फडणवीसांवर केले कडक प्रहार
हेही वाचा…“अध्यक्षांची आधी गाडी अडवली अन् नंतर निवेदन दिले,” राष्ट्रवादीच्या आमदारांची मंत्रालयात घोषणाबाजी