मुंबई : मुंबईच्या आकाशवाणी या आमदार निवासाबाहेर मंत्री हसन मुश्रीफ यांची उभी असलेली गाडी तीन मराठा आंदोलकांनी फोडली आहे. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देखील देण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यामुळे मराठा आंदोलक आता मंत्र्यांच्या गाड्यापर्यंत पोहचल्याने मुंबईत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“बोलविता धनी कोण ? भेटल्यावर सांगतो,” मनोज जरांगे पाटलांनी नितेश राणेंना झापलं
राज्य मंत्रिमंडळातील एका सदस्याच्या गाडीची संतप्त जमावाकडून तोडफोड करण्यात आली आहे. गृहमंत्र्यांना कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती राखण्यात सपशेल अपयश आले आहे. त्यांनी ही परिस्थिती हाताळता येत नसेल तर पार्ट टाईम गृहमंत्रीपद सांभाळण्यापेक्षा सरळ राजीनामा देऊन सन्मानाने मंत्रिमंडळातून बाहेर पडणे श्रेयस्कर आहे. ही परिस्थिती उद्धवण्यामागे गृहमंत्र्यांचे अपयश असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“एका ताटात जेवलोय, भाजपपासून सांभाळून रहा,” सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला इशारा
मराठा आंदोलनचा वादळ आता मुंबईत येऊन धडकलं आहे. आज सकाळी मंत्रालयाच्या अगदी बाजूला असलेल्या आकाशवाणी या आमदार निवासाबाहेर मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी फोडण्यात आली. ही घटना सकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे. तीन आंदोलकांनी हसन मुश्रीफ यांची गाडी हेरून गाडीच्या काच्या फोडल्या आहेत.
हेही वाचा…“सध्या आरक्षणाच्या नावाने केवळ पोकळ बैठकांचे सत्र”, संभाजी राजेंची सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीवर नाराजी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंदोलक हे वैजापूरमधून मुंबईत आले होते. गाडी जेव्हा फोडण्यात आली, तेव्हा त्यांनी घोषणा देखील दिल्या. त्यानंतर पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलं आहे. अजय साळुंके, संतोष निकम आणि दिपक साहानखुरे असे या आरोपींची नावे आहेत. या आंदोलकांवर पोलिस आता पुढची कारवाई करीत आहेत.
राज्य मंत्रिमंडळातील एका सदस्याच्या गाडीची संतप्त जमावाकडून तोडफोड करण्यात आली. गृहमंत्र्यांना कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती राखण्यात सपशेल अपयश आले आहे. त्यांना हि परिस्थिती हाताळता येत नसेल तर पार्ट टाईम गृहमंत्रीपद सांभाळण्यापेक्षा सरळ राजीनामा देऊन सन्मानाने मंत्रिमंडळातून…
— Supriya Sule (@supriya_sule) November 1, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“अध्यक्षांची आधी गाडी अडवली अन् नंतर निवेदन दिले,” राष्ट्रवादीच्या आमदारांची मंत्रालयात घोषणाबाजी
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक संपन्न, शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा…“आपल्या भावाचा राग देवेंद्र फडणवीसांवर काढू नका”,सुळेंना चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…मराठा आंदोलकांचा मंत्री हसन मुश्रीफांना दणका, मुंबईत तिघांनी गाडी फोडली
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी २१ वर्षीय तरूणाने संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहिलं शिक्षणापासून दुर राहिल्याची खंत