मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. तसेच मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटलांकडे अजून मुदत वाढवून मागवावी, असंही ठरवण्यात आलं. या बैठकीसाठी शरद पवार देखील उपस्थितीत होते. त्यावर आता त्यांनी प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा…“सध्या आरक्षणाच्या नावाने केवळ पोकळ बैठकांचे सत्र”, संभाजी राजेंची सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीवर नाराजी
आजच्या सर्वपक्षीय बैठकीत शरद पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलं आहे. बैठक संपल्यानंतर त्यांनी X वर पोस्ट करत माहिती दिली आहे. आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली. यावेळी आरक्षणाला पाठिंबा दर्शवत एकमताच्या ठरावावर मी पक्षाच्या वतीने सकारात्मक भूमिका दर्शवली असं लिहिलं आहे.
हेही वाचा…“आम्ही मनावर घेतलं तर यांचा आवाज ५ मिनिटात बंद करू”, जरांगे पाटलांनी कुणाला दिला इशारा ?
दरम्यान, सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतरही मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणावर ठाम राहिल्याची भूमिका घेतली आहे. सरकारला कशासाठी आणि किती वेळ हवा आहे, हे त्यांनी सांगावं, मराठ्यांना कसं आरक्षण देणार आहेत ते सांगावं वेळ घेतल्यानंतर सरसकट आरक्षण देणार आहात का ? हे सांगा. त्यानंतर आम्ही वेळ द्यायचा की नाही ते ठरवू. नाहीतर पाच मिनिटांचाही वेळ देणार नाही. मग काय व्हायचं ते पाहू असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय.
आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली. यावेळी आरक्षणाला पाठिंबा दर्शवत एकमताच्या ठरावावर मी पक्षाच्या वतीने सकारात्मक भूमिका दर्शवली. pic.twitter.com/M8P3BOsbug
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 1, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“आपल्या भावाचा राग देवेंद्र फडणवीसांवर काढू नका”,सुळेंना चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…मराठा आंदोलकांचा मंत्री हसन मुश्रीफांना दणका, मुंबईत तिघांनी गाडी फोडली
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी २१ वर्षीय तरूणाने संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहिलं शिक्षणापासून दुर राहिल्याची खंत
हेही वाचा…“बोलविता धनी कोण ? भेटल्यावर सांगतो,” मनोज जरांगे पाटलांनी नितेश राणेंना झापलं
हेही वाचा…“एका ताटात जेवलोय, भाजपपासून सांभाळून रहा,” सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला इशारा