मुंबई : मुंबईच्या आकाशवाणी या आमदार निवासाबाहेर मंत्री हसन मुश्रीफ यांची उभी असलेली गाडी तीन मराठा आंदोलकांनी फोडली आहे. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देखील देण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यामुळे मराठा आंदोलक आता मंत्र्यांच्या गाड्यापर्यंत पोहचल्याने मुंबईत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात मराठा समाजाचा रोष समजू शकतो. कोणावरही कारवाई करण्यात येऊ नये, अशी प्रतिक्रिया त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी दिलीय.
हेही वाचा…“तोपर्यंत कामगारांचा संप हा बेमुदत सुरूच राहिल,” एक्साईड इंडस्ट्रीज येथील कामगारांनी पुकारला संप
मराठा आंदोलनचा वादळ आता मुंबईत येऊन धडकलं आहे. आज सकाळी मंत्रालयाच्या अगदी बाजूला असलेल्या आकाशवाणी या आमदार निवासाबाहेर मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी फोडण्यात आली. ही घटना सकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे. तीन आंदोलकांनी हसन मुश्रीफ यांची गाडी हेरून गाडीच्या काच्या फोडल्या आहेत.
हेही वाचा…मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांनी मंजूर केला ठराव , मुख्यमंत्र्यांनीही केलं मोठं आवाहन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंदोलक हे वैजापूरमधून मुंबईत आले होते. गाडी जेव्हा फोडण्यात आली, तेव्हा त्यांनी घोषणा देखील दिल्या. त्यानंतर पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलं आहे. अजय साळुंके, संतोष निकम आणि दिपक साहानखुरे असे या आरोपींची नावे आहेत. या आंदोलकांवर पोलिस आता पुढची कारवाई करीत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी २१ वर्षीय तरूणाने संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहिलं शिक्षणापासून दुर राहिल्याची खंत
हेही वाचा…“बोलविता धनी कोण ? भेटल्यावर सांगतो,” मनोज जरांगे पाटलांनी नितेश राणेंना झापलं
हेही वाचा…“एका ताटात जेवलोय, भाजपपासून सांभाळून रहा,” सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला इशारा
हेही वाचा…“सध्या आरक्षणाच्या नावाने केवळ पोकळ बैठकांचे सत्र”, संभाजी राजेंची सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीवर नाराजी
हेही वाचा…“आम्ही मनावर घेतलं तर यांचा आवाज ५ मिनिटात बंद करू”, जरांगे पाटलांनी कुणाला दिला इशारा ?