मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणासाठी आणखी वेळ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. तर आज राज्य मागासर्वग आयोगाचे अध्यक्ष, निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्यासह निवृत्त न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला जाणार आहे. या भेटीच्या वेळी मनोज जरांगे पाटलांना एक पत्र देण्यात येणार आहे.
हेही वाचा…मराठा आंदोलकांचा मंत्री हसन मुश्रीफांना दणका, मुंबईत तिघांनी गाडी फोडली
राज्याच्या शिष्टमंडळाकडून मनोज जरांगे पाटलांना एक पत्र देण्यात येणार आहे. या पत्रात काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीचा ठराव पाटलांना दिला जाणार आहे. यातच मराठा आरक्षण देण्यासाठी वेळ वाढवून मागितला जाणार आहे. यासोबतच अंतरवाली सराटीत दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी कृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी २१ वर्षीय तरूणाने संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहिलं शिक्षणापासून दुर राहिल्याची खंत
अंतरवाली सराटीतील मनोज जरांगे पाटलांच्या सभेदरम्यान नुकसान झालेल्या ४४१ शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत उल्लेख करण्यात येणार आहे. यातच नोंदी सापडलेल्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करणे आणि मनोज जरांगे पाटलांना उपोषण मागे घेण्याची विनंती या पत्राद्वारे केली जाणार आहे. मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी प्रकिया कशी केली जाणार याचा तपशील देखील देण्यात येणार आहे. या सर्व मुद्यांसह आणखी ४ मुद्दे पत्रात असणार आहेत.
हेही वाचा…“बोलविता धनी कोण ? भेटल्यावर सांगतो,” मनोज जरांगे पाटलांनी नितेश राणेंना झापलं
दरम्यान, मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणावर तोडगा निघाला नाही तर आंदोलनाची पुढची दिशा आज ठरवली जाणार आहे. यातच राज्याच्या शिष्टमंडळाची भेट घेतल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राज्यात मराठा आरक्षण गाजत असतांना अनेकांनी हाताला बांधलं घड्याळ, मुंबईत पार पडला पक्ष प्रवेश सोहळा
हेही वाचा…अजित पवार गटाच्या नेत्यासाठी सुप्रिया सुळे धावल्या, फडणवीसांवर केले कडक प्रहार
हेही वाचा…“अध्यक्षांची आधी गाडी अडवली अन् नंतर निवेदन दिले,” राष्ट्रवादीच्या आमदारांची मंत्रालयात घोषणाबाजी
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक संपन्न, शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा…“आपल्या भावाचा राग देवेंद्र फडणवीसांवर काढू नका”,सुळेंना चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर