सोलापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूर पुणे हायवेवर रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांवर आता पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. या प्रकरणाबाबत आंदोलकांपैकी १० जणांना अटक करण्यात आली यातील एक जण फरार असल्याची माहिती समोर आलीय. मराठा आंदोलकांवर कलम ३७१ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा…राज्यात मराठा आरक्षण गाजत असतांना अनेकांनी हाताला बांधलं घड्याळ, मुंबईत पार पडला पक्ष प्रवेश सोहळा
मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी सोलापूर रस्त्यावर टायर जाळून वाहतुक व्यवस्था बिघडवली होती. यावरून आता पोलिस यंत्रणा अॅक्टिव्ह मोडवर आली असून आंदोलकांवर कलम ३७१ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातील काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांना आता कोर्टात हजर केले जाणार आहे.
हेही वाचा…अजित पवार गटाच्या नेत्यासाठी सुप्रिया सुळे धावल्या, फडणवीसांवर केले कडक प्रहार
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी झालेल्या हिंसाचारामुळे लागू करण्यात आलेली धाराशीव, बीड येथील संचारबंदी बुधवारी उठविण्यात आली. मात्र, भय आणि अफवांमुळे बाजारपेठा बंद होत्या. मंगळवारी उशिरा रात्री पाटोदा तालुक्यातील पुसळंब येथे अज्ञातांनी पोलीस चौकी पेटवून दिली होती. तर पूर्णा येथील तहसिल कार्यालयाच्या इमारतीलाही आग लावण्याचा प्रयत्न झाला होता. यातच बीड जिल्ह्यातील घटनांमध्ये ९ जणांना, तर नांदेडमध्ये ५० जणांना तर धाराशिवमध्येही हिंसक आंदोलकांच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झालीय.
READ ALSO :
हेही वाचा…मंत्रालयाबाहेर आमदारांचा चक्काजाम आंदोलन, पोलिसांकडून आमदारांची धरपकड
हेही वाचा…“..म्हणून अजित पवारांच्या विरोधातील मराठा मोर्चाचे निषेध आंदोलन केले रद्द”
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र होणार? आज विधानभवनात काय काय घडणार ?
हेही वाचा…“जरांगे पाटलांच्या जीवाचं बरंवाईट झालं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही”, कुणी दिला इशारा ?
हेही वाचा…राज्याचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीला, ‘त्या’ पत्रात कोणत्या गोष्टी असणार ?