अकोला : राज्य सरकारने सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी माझी भूमिका आहे, त्यामुळे आता पक्षाने देखील अशीच भूमिका मांडावी, असं विधान राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. यावरून आता पक्षात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण याआधी यावर कोणत्याही नेत्यांनी भूमिका मांडलेली नाही.
हेही वाचा…मंत्रालयाबाहेर आमदारांचा चक्काजाम आंदोलन, पोलिसांकडून आमदारांची धरपकड
अकोला जिल्ह्याच्या वतीने सर्व आंदोलक आज शांततेच्या मार्गाने भेटण्यासाठी आले होते. त्यांची भूमिका आहे की, मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा बांधवांसोबत जे कुणबी बांधव आहेत. त्यांनी देखील मोठा भाऊ म्हणून भूमिका जाहीर करावी की, कुणबी समाजातून आरक्षण देण्याबाबत आमची हरकत नाही. असं मिटकरी म्हणाले.
हेही वाचा…“..म्हणून अजित पवारांच्या विरोधातील मराठा मोर्चाचे निषेध आंदोलन केले रद्द”
पुढे बोलतांना अमोल मिटकरी म्हणाले की, त्यांच्याकडे विनंती केली होती. त्यावर त्यांनी होकार दिला आहे. सरसकट मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र द्या, यासाठी त्यांनी होकार दिलाय. त्यांचं निवेदन देखील स्विकारलं आहे. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने एक दिवसीय विशेषण अधिवेशन बोलावावं यासाठी आग्रही आहे. माझी भूमिका मांडली आहे. त्याचसोबत पक्षानी देखील अशीच भूमिका देखील मांडवी असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“राज्य सरकारने मराठ्यांसोबत मुस्लिम समाजालाही आरक्षण द्यावे,” महाराष्ट्रातील ‘या’ आमदाराने केली मागणी
हेही वाचा…““मराठा समाज हा काय पाकिस्तान, अमेरिकेतला,”? मराठा आरक्षणाबाबत बच्चू कडूंचा संतप्त सवाल
हेही वाचा…‘क्या हार में क्या जीत मैं,’ निलेश राणेंच्या स्वागतासाठी जोरदार बॅनरबाजी, आज शक्तीप्रदर्शन करणार
हेही वाचा…“सत्तेत असणारे आमदार आंदोलन करतात म्हणजे.., रोहित पवारांनी व्यक्त केली ‘ती’ शंका
हेही वाचा…पोलिस यंत्रणा ‘ॲक्टिव्ह मोड’ वर, जाळपोळीच्या घटनांवरून १० मराठा आंदोलकांना पोलिसांनी केली अटक