मुंबई : शिवसेना अपात्र आमदारांच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी व्हिपच्या मुद्यावरून ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला. आमदारांना जारी करण्यात आलेला व्हिप हा ई मेलच्या माध्यमातून पाठवण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाच्या वकिलांनी केला. तर तो व्हीप आपल्याला मिळालाच नसल्याने व्हिपचे उल्लंघन केलं नसल्याचं शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितलं. यावरून विधीमंडळाच्या सभागृहात जोरदार खडाजंगी बघायला मिळाली.
हेही वाचा…पोलिस यंत्रणा ‘ॲक्टिव्ह मोड’ वर, जाळपोळीच्या घटनांवरून १० मराठा आंदोलकांना पोलिसांनी केली अटक
ई मेलवरून व्हिप पाठवल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला. त्यासंबंधित त्यांनी पुरावेही सादर केले. पण ज्यावर व्हिप पाठवण्यात आले होते ते ई मेल आपले नसल्याचा दावा शिंदे गटाच्या वकिलांनी केला. आपल्याला व्हिपच मिळाला नाही, त्यामुळे त्यांचं उल्लंघन केलं असं होत नसल्याचं शिंदे गटाच्यावतीने सांगण्यात आलं.
हेही वाचा…मंत्रालयाबाहेर आमदारांचा चक्काजाम आंदोलन, पोलिसांकडून आमदारांची धरपकड
ईमेल चुकीचा असेल तर तो त्यांनी सांगावं. त्यावर आयटी कायद्यानुसार ईमेल हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांना स्पेशल ईमेल आयडी मिळाला आहे का ? महेश शिंदे यांनी maheshshinde003 असा मेल आयडी दिलाय. हा आयडी कुठला आहे. तुम्ही म्हणता ईमेल दिला आहे पण ते म्हणतात तसंच चुकीच्या ईमेलला जर दिला असेल तर त्याला उत्तर काय ? असा सवाल नार्वेकरांनी ठाकरे गटाच्या वकिलांना दिला.
हेही वाचा…“..म्हणून अजित पवारांच्या विरोधातील मराठा मोर्चाचे निषेध आंदोलन केले रद्द”
त्यावर जर आम्ही व्हिप पाठवलेला ईमेल चुकीचा आहे तर बरोबर कुठला आहे ते त्यांनी सांगावं. असा सवाल ठाकरे गटाकडून देवदत्त कामत यांनी केला. या प्रकरणात नव्याने पुरावे सादर करण्याची गरज नाही. गेल्या सुनावणीत आपण अर्ज दाखल केला होता. जे पुरावे कोर्टाने सादर केले आहेत. त्याला माझा विरोध आहे. कोर्टाने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे,” मिटकरींच्या भूमिकेनंतर पक्षात वाद होण्याची शक्यता ?
हेही वाचा…“राज्य सरकारने मराठ्यांसोबत मुस्लिम समाजालाही आरक्षण द्यावे,” महाराष्ट्रातील ‘या’ आमदाराने केली मागणी
हेही वाचा…““मराठा समाज हा काय पाकिस्तान, अमेरिकेतला,”? मराठा आरक्षणाबाबत बच्चू कडूंचा संतप्त सवाल
हेही वाचा…‘क्या हार में क्या जीत मैं,’ निलेश राणेंच्या स्वागतासाठी जोरदार बॅनरबाजी, आज शक्तीप्रदर्शन करणार
हेही वाचा…“सत्तेत असणारे आमदार आंदोलन करतात म्हणजे.., रोहित पवारांनी व्यक्त केली ‘ती’ शंका