मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील राजकीय नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू झाला आहे. राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर अध्यक्ष शरद पवारांनी मैदानात उतरून सभांचा धडाका सुरू केला आहे. तर त्याला उत्तर सभा म्हणून अजित पवार गट देखील रणनीती आखत आहे. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या देखील आगामी काळात सभा होणार आहे. त्यामुळे राज्यात निवडणुकांना सुरूवात झाली असल्याचं चित्र सध्या राज्यात दिसत आहेत.
हेही वाचा…“लाठीचार्जचे आदेश वरिष्ठांनी दिले सिद्ध करा, तुम्ही सांगाल ते..,” अजित पवारांनी विरोधकांना दिलं खुलं चॅलेंज
शरद पवार यांची काल जळगावात जाहीर सभा पार पडली. या सभेतून शरद पवार गटाकडून भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटावर तुफान फटकेबाजी केली. त्यालाच आता प्रत्त्युत्तर देण्यासाठी अजित पवार गटाची कोल्हापुर आणि जळगावात उत्तर सभा होणार आहे. १० तारखेला कोल्हापुरात तर गणेशोत्सवानंतर जळगावात सभा होणार आहे.
हेही वाचा…लाठीचार्जवरून देवेंद्र फडणवीसांनी मागितली माफी, तर विरोधकांवर हल्लाबोल
दरम्यान, उद्धव ठाकरे यांची १० सप्टेंबर रोजी जळगावात तोफ धडाडणार आहे. नगरमधील दुष्काळी दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे आता जळगावाचा दौरा करणार असून त्यांची त्याठिकाणी जाहीर सभा देखील होणार आहे. तर येत्या १६ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा आयोजित करण्यात आला आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रमा दिनाच्या पुर्वसंध्येला ते संभाजी नगरमध्ये येणार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांची ताकद वाढली, माजी आमदाराचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश, विरोधकांना बसला धसका
हेही वाचा…“तेव्हा डोकी फोडली जातात अन् खोके सरकारमध्ये जनरल डायर अवतरतात,” आदित्य ठाकरेंचा सरकारवर घणाघात
हेही वाचा…अजित पवारांचा खंदे समर्थक आमदार अडचणीत, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचा पेपर अवघड जाणार ?
हेही वाचा…वडिल लोकसभेवर गेले तर लेकींच्या राजकीय पदार्पणाचा मार्ग सोपा, नांदेडचं राजकीय गणित काय?
हेही वाचा…“मराठा समाजाने आता संयम बाळगावा, सरकार मराठा समाजाच्या पाठीशी”, एकनाथ शिंदेंचं आंदोलकांना आवाहन