नांदेड : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत काॅंग्रेसला फक्त दोनच जागा मिळालया. मोदी लाटेत अशोक चव्हाण यांनी विजय मिळवत दिल्लीच्या राजकारणात वापसी केली. परंतु २०१९ च्या लाटेत नांदेडची जागा राखण्यात अशोक चव्हाण अयशस्वी ठरले. याठिकाणी वंचितचा काॅंग्रेसला मोठा फटका बसला आणि भाजपचे प्रतापराव चिखलीकर निवडून आले. सध्या नांदेडमध्ये अशोक चव्हाण विरूद्ध प्रतापराव चिखलीकर यांच्यात वचर्स्वाचं राजकारण सुरू आहे.
हेही वाचा…“..त्यामुळे एका क्षणात राजकारणात प्रवेश केला,” राजकारणात येण्यापुर्वीचा पंकजा मुंडेंनी सांगितला ‘तो’ किस्सा
आगामी निवडणुकीत आता अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरूय. भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये आली असता अशोक चव्हाणांनी श्रीजयाची राजकारणात एन्ट्री केली. यातच त्यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या पोस्टरमुळे देखील त्या चर्चेत आल्या होत्या. श्रीजया चव्हाण भोकर किंवा नांदेड उत्तर मतदारसंघातून निवडणुक लढवणार असल्याच्या राजकीय चर्चा सुरूय. भोकरदन विधानसभेतील अशोक चव्हाण लोकसभेवर गेले तर त्यांच्या जागी श्रीजया यांच्या नावाची चाचपणी सुरू झाली आहे.
हेही वाचा…११४ पानाचा लेखी अहवाल सरकारकडे सादर, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या हालचाली सुरू
दुसरीकडे भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी देखील आपल्या लेकीला विधानसभेवर पाठवण्याचं ठरवलं आहे. प्रताप पाटील चिखलीकरांची कन्या प्रणिता पाटील देवरे यांना आमदार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यांना नांदेड दक्षिण किंवा लोहा कंधारमधून त्यांना तिकीट देण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रणिती पाटील यांची राजकारणात एंन्ट्री झालीय. जनसंपर्क वाढवत संघटनात्मक पातळीवर ताकद वाढवण्याचा प्रणिती पाटील यांचा प्रयत्न आहे. वडिल लोकसभेवर गेले तर आपल्या लेकीचा राजकीय पदार्पणाचा मार्ग सोपा होईल. अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“मराठा समाजाने आता संयम बाळगावा, सरकार मराठा समाजाच्या पाठीशी”, एकनाथ शिंदेंचं आंदोलकांना आवाहन
हेही वाचा…“लाठीचार्जचे आदेश वरिष्ठांनी दिले सिद्ध करा, तुम्ही सांगाल ते..,” अजित पवारांनी विरोधकांना दिलं खुलं चॅलेंज
हेही वाचा…लाठीचार्जवरून देवेंद्र फडणवीसांनी मागितली माफी, तर विरोधकांवर हल्लाबोल
हेही वाचा…“मराठा आरक्षणावर वरवंटा फिरवणारा खरा जनरल डायर उद्धव ठाकरे”, चित्रा वाघ यांची टिका
हेही वाचा…टरबूज पायाखाली तुडवत मराठा संघटनेकडून निषेध, फडणवीसांच्या विरोधात जोरदार घोषणा