मुंबई : मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटे गावात बसलेल्या मनोज जरांगे पाटलांची वारंवार वैद्यकीय तपासणी केली जात आहे. तसेच जास्त न बोलण्याचा सल्ला देखील डॉक्टरांनी जरांगे पाटलांना दिलाय. यातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. त्याआधी राज्यातील प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांची भेट घेतली आहे. तर दुसरीकडे आता सत्ताधाऱ्यांची मुंबईत यासंदर्भात बैठक होत आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्र द्वेष्ट्या मिंधे- भाजप सरकार..,! अजून किती अन्याय करणार महाराष्ट्रावर?”
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. धाराशिवचे जिल्ह्याधिकारी डॉ. सचिन ओम्सबे यांनी ११४ पानाचा लेखी अहवाल सादर केला आहे. मराठा कुणबी असल्याच्या कागदपत्रासह अहवाल सादर केला आहे. धाराशिव व उमरगा तालुक्यात मराठा हे कुणबी नोंदी असल्याचे पुरावे आढळले आहेत. नाव नमुना १४ मध्ये ८९ ठिकाणी कुणबी असल्याच्या नोंदी आढळल्या आहेत.
हेही वाचा…“दडपशाही करणारं मिंधे भाजपा सरकार युवकांच्या जीवावर उठलंय”, आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. तर त्यावर मंत्री छगन भुजबळ आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यावर हस्तक्षेप नोंदवला आहे. यातच आज मराठा समाजाच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. तर राज्यातील अनेक शहारात बंद पुकारला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीला अकोल्यात मोठा धक्का, पक्ष फुटीचा ठाकरेंना फायदा, माजी आमदार ठाकरे गटात
हेही वाचा…“लाठीहल्ल्यानंतर अजित पवार नाराज,” बाहेर पडा, बाहेर पडा, सत्तेतून बाहेर पडा, बारामतीत जोरदार घोषणा
हेही वाचा…तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् अजित पवार सत्तेतून बाहेर पडायची भूमिका घेतील का ?
हेही वाचा…“लाठीहल्ला करण्याचा आदेश देणाऱ्यांना मराठवाड्यात बंदी घाला,” राज ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
हेही वाचा…“दोन्ही उपमुख्यमंत्री किती दिवस तोंड लपवणार ?” विजय वडेट्टीवारांचा खोचक सवाल