जालना : मराठा आरक्षणासाठी बसलेल्या जरांगे पाटलांच्या भेटीसाठी अनेक राजकीय नेते अंतरवाली सराटी येथे जात आहेत. यातच काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जरांगे पाटलांच्या भेटीगाठी गेले होते. यावेळी पोलिसांनी चालवलेल्या गोळी देखील जरांगे पाटलांनी उद्धव ठाकरेंना दाखवली. यानंतर आता युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टिका केलीय.
हेही वाचा…“गृहमंत्र्यांनी आपली जबाबदारी स्विकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,” शरद पवारांची अप्रत्यक्षपणे मागणी
उद्धव ठाकरे यांनी काल अंतरवाली सराटी येथे जाऊन अमानुष लाठीहल्ला झालेल्या मराठा आंदोलकांची भेट घेतली. जखमींची विचारपूस केली. त्यांना धीर दिला. अन्यायकारक राजवटीच्या विरूध्द शिवसेना आंदोलकांसोबत ठाम उभी राहिल हा विश्वास दिला. त्याचसोबत आत्ताच्या निर्लज्ज सरकारची सालटी काढली. सरकारचा कुटील डाव उघड केला. असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…मुंबई महापालिकेत खिचडी घोटाळा, अनेकांवर गुन्हे दाखल, ठाकरेंच्या नेत्यांवर भाजपचा आरोप
दरम्यान, जालन्यामधील मराठा आरक्षणावर क्रूर हल्ला करणाऱ्या खोके सरकारचे धटनाबाह्य मुख्यमंत्री आणि गृहमंत्री खरंच राजीनामा देतील का? तेवढी संवेदनशिलता किंवा खरंतर लाज उरली आहे का? आपल्याच जनतेवर एवढा अत्याचार करणारं हे पहिलंच सरकार! बारसू, वारकरी, खारघर आणि आता जालना… महाराष्ट्र द्वेष्ट्या मिंधे- भाजप सरकारचा हा कारभारच कलंकित आहे! अजून किती अन्याय करणार महाराष्ट्रावर? असा सवाल देखील त्यांनी केलाय.
काल पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जाऊन अमानुष लाठीहल्ला झालेल्या मराठा आंदोलकांची भेट घेतली, जखमींची विचारपूस केली, त्यांना धीर दिला, अन्यायकारक राजवटीच्या विरुद्ध शिवसेना आंदोलकांसोबत ठाम उभी राहिल हा विश्वास दिला.
त्याचसोबत आत्ताच्या… pic.twitter.com/6LhGo5sfhH— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 3, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“दडपशाही करणारं मिंधे भाजपा सरकार युवकांच्या जीवावर उठलंय”, आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड, मराठा आरक्षण आंदोलन चिघळलं
हेही वाचा…“हिंसक वळण देऊन आंदोलनाला बदनाम करण्याचा काही मंडळींचा प्रयत्न सुरूय,” अशोक चव्हाणांचा रोख नेमका कुणाकडे ?
“आतापर्यंत जातीसाठी माती खाल्ली, आता रयतेसाठी लढा”, वंचितने आरक्षणाचा फॉर्म्यूला मांडला
हेही वाचा…“मराठा समाज सहन करतो म्हणून परीक्षा..,”उदयन राजे यांनी दिला सरकारला कडक इशारा