मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. मुंबई महापालिकेचया कथित डेड बॉडी प्रकरणानंतर आता खिचडी घोटाळ्यातली आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. यावरून भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी ठाकरे गटातील नेत्यांवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“भाड्याने जमवलेली पार्टी म्हणजे भाजप”, ठाकरेंची मुंबईत भाजपवर जोरदार फटकेबाजी
आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हे शाखेने संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, सुनील बाळा कदम, महापालिकेचे तत्कालीन सहा. आयुक्त, नियोजन, बीएमसी अधिकारी, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळूंखे, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा कॅटरर्सटेचे भागीदार, इतर बीएमसी अधिकारी आणि इतर संबंधित खासगी लोकांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा…“शौर्य दाखवायची खुमखुमी आता मिटली असेल तर..,” जालन्यात मराठा मोर्चावरील लाठीचार्जवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी देखील ट्टिटच्या माध्यमातून ठाकरेंवर निशाणा साधलाय. मुंबई महापालिका कोविड लॉकडाऊन १३२ कोटींचा खिचडी घोटाळा झाला आहे. गरीब कामगारांची खिचडी कोणी खाल्ली ? खिचडीचे पैसे संजय राऊतांचे भाऊ संदिप आणि मुलीचा खात्यात गेले. आदित्य ठाकरेंचे सहयोगी सुरज चव्हाणांच्या खात्यात गेले! सुजित पाटकर, राजिव साळुंखे, बाळा कदम चा खात्यात कोट्यवधी रुपये गेले. असा आरोप त्यांनी केलाय.
हेही वाचा…aditya l1 launch video ! चंद्रानंतर आता सूर्याच्या दिशेने भारताचे यशस्वी पाऊल! आदित्य एल-१ चे यशस्वी प्रक्षेपण
₹132 कोटींचे पेमेंट केले महापालिकेने, परंतू त्यातील निम्मी बिलं बोगस असंही सोमय्यांनी म्हटलंय. मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. मृत पावलेल्या लोकांच्या टाळूवरील लोणी खणाऱ्यांना कफन (बॉडीबॅग) घोटाळा, कोविड हॉस्पिटल घोटाळा, रेमडेसिविर घोटाळा, ऑक्सिजन घोटाळा, हिशोब द्यावाच लागणार असा इशारा देखील त्यांनी दिलाय.
मुंबई महापालिका कोविड लॉकडाऊन ₹132 कोटींचा खिचडी घोटाळा!
गरीब कामगारांची खिचडी कोणी खाल्ली?
खिचडीचे पैसे संजय राऊतांचे भाऊ संदिप आणि मुलीचा खात्यात गेले
आदित्य ठाकरेंचे सहयोगी सुरज चव्हाणांच्या खात्यात गेले!सुजित पाटकर, राजिव साळुंखे, बाळा कदम चा खात्यात कोट्यवधी रुपये गेले
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 2, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मार्ग काढण्याची सरकारची तयारी, कृपया शांतता राखा,” अजित पवारांचं आवाहन
हेही वाचा…जालना लाठीचार्ज प्रकरण…! “कृत्याची दाहकता मन खिन्न करणारी,” संभाजी राजे सरकारवर संतापले
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पुर्ण केलं नाही,” शरद पवारांचा जालन्यातून हल्लाबोल
हेही वाचा…“फडणवीसांची मराठा समाजाशी दगाबाजी, याच दगाबाजीविरूद्ध मराठा समाज पेटून उठलाय”