जालना : जालन्यातील घटनेचे राज्यभरात पडसाद उमटू लागले आहेत. सोलापूरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको करण्यात आला आहे. तर लातूरमध्येही मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे. यातच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे. मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ ही भूमिका घेतली आहे. यावरून आता खासदार संभाजी राजे यांनी आंदोलनकांची भेट घेतली आहे.
हेही वाचा…“घोडा मैदान जवळ, लावा ताकद”, मनसेच्या फायर ब्रॅंड नेत्याने सरकारला दिला इशारा
संभाजी राजे यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलन स्थळी सकाळी भेट दिली. काल पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज व गोळीबार मध्ये जखमी झालेल्या व सध्या रूग्णालयात उपचार घेत असलेल्या समाजबांधवांना भेटून त्यांना धीर दिला. अत्यंत अमानुष पद्धतीने पोलिसांनी केलेल्या या कृत्याची दाहकता मन खिन्न करणारी आहे. कोणत्याही दडपशाहीला बळी न पडता समाजबांधवांनी हे आंदोलन नेटाने सुरू ठेवले आहे. त्यांच्या पाठीशी व त्यांच्या निर्णयाच्या सोबत मी सदैव उभा आहे. असंही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा…जालना लाठीचार्ज प्रकरण..! 200 पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल, ४५ पोलीस जखमी, संपुर्ण राज्यात संताप
पुढे बोलतांना ते म्हणाले की, अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला व शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी गोळीबार केला. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल. मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणूकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार असेल.
अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलन स्थळी सकाळी भेट दिली. काल पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज व गोळीबार मध्ये जखमी झालेल्या व सध्या रूग्णालयात उपचार घेत असलेल्या समाजबांधवांना भेटून त्यांना धीर दिला. अत्यंत अमानुष पद्धतीने पोलिसांनी केलेल्या या कृत्याची दाहकता मन खिन्न… pic.twitter.com/7WyonnlqGi
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) September 2, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पुर्ण केलं नाही,” शरद पवारांचा जालन्यातून हल्लाबोल
हेही वाचा…“फडणवीसांची मराठा समाजाशी दगाबाजी, याच दगाबाजीविरूद्ध मराठा समाज पेटून उठलाय”
हेही वाचा…“भाड्याने जमवलेली पार्टी म्हणजे भाजप”, ठाकरेंची मुंबईत भाजपवर जोरदार फटकेबाजी
हेही वाचा…“शौर्य दाखवायची खुमखुमी आता मिटली असेल तर..,” जालन्यात मराठा मोर्चावरील लाठीचार्जवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा…aditya l1 launch video ! चंद्रानंतर आता सूर्याच्या दिशेने भारताचे यशस्वी पाऊल! आदित्य एल-१ चे यशस्वी प्रक्षेपण