जालना : जालन्याच्या अतंरवाली गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आक्रोश मोर्चांच उपोषण सुरू होतं. यामध्ये मराठा आक्रोश मोर्चाचे मनोज जरांगे पाटील यांची उपोषण सुरू असतांना प्रकृती बिघडली. त्यानंतर पोलिसांना आंदोलन थांबवण्याचे प्रयत्न सुरू झाले. परंतु मोर्चेकरी मानायला तयार नसल्याने पोलिसांनी लाढीचार्ज केले. उपोषण रोखण्याच्या प्रयत्नावेळी पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये धुमश्चक्री झाली. यानंतर आता संपुर्ण राज्यातून संतापाची लाट उसळली आहे. यातच काल घटना घडली होती आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज घटनेचा निषेध दर्शविला. त्यावर आता पुण्याचे शरद पवार गटाचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्यांना डिवचलं आहे.
हेही वाचा…aditya l1 launch video ! चंद्रानंतर आता सूर्याच्या दिशेने भारताचे यशस्वी पाऊल! आदित्य एल-१ चे यशस्वी प्रक्षेपण
जालना येथे काल मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार्या आंदोलकांवर लाठीचार्ज तसेच हवेत गोळीबार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अमानुष घटनेचा निषेध आहे. मराठा समाजाला आपल्या हक्कांसाठी लढताना अशाप्रकारच्या वागणुकीला सामोरे जावे लागत आहे, ही लाजीरवाणी बाब आहे. असं ट्विट सुनील तटकरे यांनी केलं आहे. त्यावर साधा निषेध करायला 24 तास लागले लुटूपुटू च्या प्रदेशाध्यक्षांना. खरे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्षांसोबत जखमी आंदोलकांना भेटले. असं म्हणत प्रशांत जगतापांनी त्यांना डिवचलंय.
हेही वाचा…“घोडा मैदान जवळ, लावा ताकद”, मनसेच्या फायर ब्रॅंड नेत्याने सरकारला दिला इशारा
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. या घटनेबाबत मराठा बांधवांसह सर्व महाराष्ट्रवासियांच्या भावना तीव्र आहेत. राज्य शासन देखील या भावनांशी सहमत असून शासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मराठा समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करुन या प्रश्नी तोडगा काढण्याची राज्य सरकारची तयारी आहे. असं अजित पवारांनी म्हटलंय.
साधा निषेध करायला 24 तास लागले लुटूपुटू च्या प्रदेशाध्यक्षांना. खरे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्षांसोबत जखमी आंदोलकांना भेटले. https://t.co/U4pnlWSflj
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) September 2, 2023
READ ALSO :
हेही वाचा…जालना लाठीचार्ज प्रकरण…! “कृत्याची दाहकता मन खिन्न करणारी,” संभाजी राजे सरकारवर संतापले
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पुर्ण केलं नाही,” शरद पवारांचा जालन्यातून हल्लाबोल
हेही वाचा…“फडणवीसांची मराठा समाजाशी दगाबाजी, याच दगाबाजीविरूद्ध मराठा समाज पेटून उठलाय”
हेही वाचा…“भाड्याने जमवलेली पार्टी म्हणजे भाजप”, ठाकरेंची मुंबईत भाजपवर जोरदार फटकेबाजी
हेही वाचा…“शौर्य दाखवायची खुमखुमी आता मिटली असेल तर..,” जालन्यात मराठा मोर्चावरील लाठीचार्जवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया