जालना : जालन्यातील घटनेचे राज्यभरात पडसाद उमटू लागले आहेत. सोलापूरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको करण्यात आला आहे. तर लातूरमध्येही मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे. यातच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे. जालन्यात आंदोलकांशी भेट घेण्यासाठी शरद पवार देखील गेले होते. मात्र यावेळी आंदोलकांनी शरद पवार यांच्या ताफ्यात असलेली पोलिसांची गाडी देखील फोडली आहे.
हेही वाचा…“मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मार्ग काढण्याची सरकारची तयारी, कृपया शांतता राखा,” अजित पवारांचं आवाहन
काल घटना घडल्यानंतर अनेक नेत्यांनी जालना येथील अंतरवाली सराटी येथे करण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी भेटी दिल्या. आज शरद पवारांनी देखील आंदोलकांशी चर्चा केली. त्याआधी आंदोलनस्थळी पोहचण्यासाठी निघालेल्या शरद पवारांच्या गाड्या आंदोलकांनी अडवल्या. यामध्ये शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आली आहे.
हेही वाचा…“जालन्याची घटना घडली काल, अन् अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांनी ट्विट केलं आज,” राष्ट्रवादीच्याच नेत्यानी लगावला टोला
अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे शरद पवार जाणार असल्याने औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा एक पथक त्यांच्या ताफ्यात बंदोबस्तासाठी गेले होते. मात्र यावेळी काही अज्ञात लोकांनी डीवायएसपी सिद्धेश्वर भोरे यांच्या शासकीय वाहनावर दगडफेक केली. तसेच गाडीला लाथा मारून नासधुस करण्याचा प्रयत्न केला. वाढत जमाव पाहता पोलिसांनी तेथून काढता पाय घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“हिंसक वळण देऊन आंदोलनाला बदनाम करण्याचा काही मंडळींचा प्रयत्न सुरूय,” अशोक चव्हाणांचा रोख नेमका कुणाकडे ?
“आतापर्यंत जातीसाठी माती खाल्ली, आता रयतेसाठी लढा”, वंचितने आरक्षणाचा फॉर्म्यूला मांडला
हेही वाचा…“मराठा समाज सहन करतो म्हणून परीक्षा..,”उदयन राजे यांनी दिला सरकारला कडक इशारा
हेही वाचा…“गृहमंत्र्यांनी आपली जबाबदारी स्विकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,” शरद पवारांची अप्रत्यक्षपणे मागणी
हेही वाचा…मुंबई महापालिकेत खिचडी घोटाळा, अनेकांवर गुन्हे दाखल, ठाकरेंच्या नेत्यांवर भाजपचा आरोप