चंद्रपूर : लोकसभेच्या आगामी विशेष अधिवेशनात कायदा करा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या. काॅंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि खासदार राहुल गांधी यांच्यासह काॅंग्रेसचे सर्व खासदार या मागणीला पाठिंबा देतील. असं राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. तसेच अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलनकर्त्यांवर दाखल केलेले ट्रीपल इंजिन सरकारने तातडीने मागे घ्यावे, अशीही मागणी त्यांनी केलीय.
हेही वाचा…“हिंसक वळण देऊन आंदोलनाला बदनाम करण्याचा काही मंडळींचा प्रयत्न सुरूय,” अशोक चव्हाणांचा रोख नेमका कुणाकडे ?
मराठा आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्राद्री अतिथी गृहावर बैठक सुरू आहे. मराठा समाजाला कुणबी समाजाचं सर्टिफिकेट देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. यातच लोकसभेच्या विशेष अधिवेशनात जर मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत कायदा केला नाही तर ट्रीपल इंजिन सरकारमधून बाहेर पडायची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित दादा घेतील का ? असा सवाल देखील वडेट्टीवारांनी केलाय.
हेही वाचा…“आतापर्यंत जातीसाठी माती खाल्ली, आता रयतेसाठी लढा”, वंचितने आरक्षणाचा फॉर्म्यूला मांडला
दरम्यान, फोडाफोडीच्या राजकारणाने सव्वा वर्षांपूर्वी महायुतीने सत्ता स्थापन केली. तेव्हा पासून मराठा आरक्षणासाठी कोणतेही पाऊल सरकारने का उचलले नाही? आंदोलनकर्त्यांना अमानुषपणे लाठीचार्ज करून, त्यांना गंभीर जखमी करून आता समित्यांचा फार्स कशाला ? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
लोकसभेच्या विशेष अधिवेशनात जर मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत कायदा केला नाही तर ट्रीपल इंजिन सरकारमधून बाहेर पडायची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित दादा घेतील का ? @mieknathshinde @AjitPawarSpeaks pic.twitter.com/hUxx5fP6RY
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 4, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“लाठीहल्ला करण्याचा आदेश देणाऱ्यांना मराठवाड्यात बंदी घाला,” राज ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
हेही वाचा…“दोन्ही उपमुख्यमंत्री किती दिवस तोंड लपवणार ?” विजय वडेट्टीवारांचा खोचक सवाल
हेही वाचा…“महाराष्ट्र द्वेष्ट्या मिंधे- भाजप सरकार..,! अजून किती अन्याय करणार महाराष्ट्रावर?”
हेही वाचा…“दडपशाही करणारं मिंधे भाजपा सरकार युवकांच्या जीवावर उठलंय”, आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड, मराठा आरक्षण आंदोलन चिघळलं