मुंबई : गेल्या सात दिवसापासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरदार गाजत आहेत. यात अंतरवाली सराटे गावात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची विविध नेत्यांनी भेट घेतली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांच्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झाडत आहेत. यावरून महाराष्ट्रात तीन-तीन जनरल डायर आहेत. महाराष्ट्रात जनरल डायरचं सरकार असं म्हणत खासदार संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. त्यावरून आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राऊतांना सुनावलंय.
हेही वाचा…तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् अजित पवार सत्तेतून बाहेर पडायची भूमिका घेतील का ?
ह्या सामनावीराने झाडलेल्या फुसक्या फैरी ऐकल्या. आम्ही जनरल डायर की आणखी कोण, ते मायबाप महाराष्ट्रच ठरवेल. पण, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दिलेल्या आणि मोठ्या कष्टाने उच्च न्यायालयात टिकवलेल्या मराठा आरक्षणावर वरवंटा फिरवणारा खरा जनरल डायर हे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यांच्या नाकर्त्या धोरणाची परिणती सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण धारातीर्थी पडण्यात झाली. आरक्षण टिकवण्याच्या जबाबदारीपासून पळालेले तुम्ही भगोडे आणि कायर आहात. असा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी राऊतांवर चढवला.
हेही वाचा…“लाठीहल्ला करण्याचा आदेश देणाऱ्यांना मराठवाड्यात बंदी घाला,” राज ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
दरम्यान, जालन्यात आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यच्या निषेधार्थ कल्याणमध्ये मराठा संघटनेकडून आंदोलन करण्यात आला. यावेळी मराठा संघटनेकडून पायाखाली टरबूज तुडवत या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मराठा संघटनांकडून देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं पेटलंय.
ह्या ‘सामना’वीराने झाडलेल्या फुसक्या फैरी ऐकल्या. आम्ही जनरल डायर की आणखी कोण, ते मायबाप महाराष्ट्रच ठरवेल
पण,
देवेंद्र फडणवीस जी यांच्या सरकारने दिलेल्या आणि मोठ्या कष्टाने उच्च न्यायालयात टिकवलेल्या मराठा आरक्षणावर वरवंटा फिरवणारा खरा जनरल डायर हे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव…— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 4, 2023
READ ALSO :
हेही वाचा…टरबूज पायाखाली तुडवत मराठा संघटनेकडून निषेध, फडणवीसांच्या विरोधात जोरदार घोषणा
हेही वाचा…“..त्यामुळे एका क्षणात राजकारणात प्रवेश केला,” राजकारणात येण्यापुर्वीचा पंकजा मुंडेंनी सांगितला ‘तो’ किस्सा
हेही वाचा…११४ पानाचा लेखी अहवाल सरकारकडे सादर, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या हालचाली सुरू
हेही वाचा…राष्ट्रवादीला अकोल्यात मोठा धक्का, पक्ष फुटीचा ठाकरेंना फायदा, माजी आमदार ठाकरे गटात
हेही वाचा…“लाठीहल्ल्यानंतर अजित पवार नाराज,” बाहेर पडा, बाहेर पडा, सत्तेतून बाहेर पडा, बारामतीत जोरदार घोषणा