अहमदनगर: महाराष्ट्रात कोरोना महामारीने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. महाराष्ट्रात कोरोना या महामारीत राजकारण चांगलेच ढवळून निघाले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्षात त्याच प्रमाणे महाविकास आघाडी आणि केंद्र सरकार यांच्यात चांगलाच संघर्ष झाला आहे. कोरोना लसीकरण, लसींचे दर, रेमेडीसीवर चा पुरवठा, ऑक्सिजनचा पुरवठा या विषयांवरून एकमेकांवर मोठ्या प्रमाणात टीका देखील केल्या आहे. अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी नुकतेच खासगी विमानाने दिल्ली दौरा करून जिल्हातील नागरिकांसाठी रेमेडीसीवर चा साठा आणला होता. या संदर्भात त्यांनी व्हिडिओ पोस्ट करत माहिती देखील दिली होती.
त्यांनी रेमेडीसीवर चा एवढा मोठा साथ आणला कुठून ? त्यातील रेमेडीसीवर ओरिजिनल होते कि नाही? त्यांना रेमेडीसीवर भेटलेच कसे? असे विविध प्रश्न यावेळी विरोधकांनी उपस्थित केले. तसेच त्यांच्यावर या विरोधात न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आलेली आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मी जो काही व्हिडीओ काढला होता, तो सर्वांनी पाहिला आहे. मी त्या व्हिडीओमध्ये कोणतीही संख्या सांगितली नाही. त्यामुळे 10 हजारांचा आकडा कुणी काढला हे मला माहिती नाही. जिल्ह्यातील कोणत्याही आमदाराने या प्रकाराबद्दल मला विचारणा करावी, मी त्यांना उत्तर देण्यास तयार आहे असे त्यांनी म्हटले आहे. माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला तर माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. मी कारवाईला घाबरत नाही, असं सुजय विखे यांनी स्पष्ट केलं आहे. यावरून आता राजकारण रंगण्याची शक्यता आहे.
मी रेमडेसिवीरचा काळाबाजार वा गैरकृत्य केले नाही!
इंजेक्शन कोणाला दिली याच्या नोंदी आहेत: सुजय विखे
कोणत्याही कारवाईला घाबरत नसल्याचेही केले स्पष्ट.
जे इंजेक्शन तुम्ही वाटले ते जमा करणार आहात का, असा सवाल त्यांना करण्यात आला. यावर’इंजेक्शन आहे तरी कुठे? जे इंजेक्शन आले होते, ते आधीच वाटले आहे. चार दिवसांआधीच वाटप केले होते आणि नंतर मी व्हिडीओ तयार केला होता. ज्यांना कुणाला पुरावा हवा असेल त्याबद्दल सरकारी कागद पत्र माझ्याजवळ आहे. मी कोणत्याही कारवाईला घाबरत नाही. माझ्यामुळे ज्या रुग्णाचे जीव वाचले ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. आता रिकामे डबे उरलेले आहे , त्यांना घेऊन जायचे असेल तर घेऊन जाऊ शकता, असं सुजय विखे पाटील म्हणाले.
खासदार डॉ सुजय विखे यांनी १०,००० रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा कोणतेही कायदेशीर परवाना व अधिकार नसताना गोपनीय व्यक्तीकडून किंवा काळ्या बाजारातुन खरेदी केली असावी, सदर रेम्डेसिवीर इंजेक्शनचा साठा भेसळ मुक्त / शुद्ध आहे असे प्रमाणपत्र वापराआधी घेतलेले नाही, एवढा मोठा रेम्डेसिवीर इंजेक्शनचा साठा कुठे व कसा वापरला याचा हिशोब नाही अश्या मुद्यांवर सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू, चंद्रभान घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे ऍड सतीश तळेकर यांच्या मार्फत फौजदारी याचिका दाखल करून गुन्हा दाखल करावा अशी विनंती केली आहे.
हे पण वाचा
आधी कळलं असतं तर डॉक्टर सुजय विखे पाटलांचाच नंबर दिला असता – जयंत पाटील
जिल्ह्या बाहेरील नेत्यांना उत्तर देण्यास मी बांधिल नाही; सुजय विखेंचा नाव न घेता रुपाली चाकणकरांना टोला
अहमदनगरच्या दुसऱ्या खासदारांवर होणार गुन्हा दाखल? खासदार सुजय विखे पाटलांना गनिमी कावा पडणार महागात
‘सुजय विखेंनी त्या बॉक्स मध्ये काय होते हे स्पष्ट करावे’