नवी दिल्ली : हिंदू असेल तर तो देशभक्त असायलाच हवा. देशभक्त असणे हे हिंदूंच्या नसानसात भिनलेले असते. हिंदू भारतद्रोही असूच शकत नाही, अशी हिंदूंची व्याख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी यांनी एका कार्यक्रमात केली होती. यावर आता एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी गाधीजींची हत्य करणाऱ्या गोडसेबाबत काय विचार आहे ? असा खोचक सवाल मोहन भागवत याना केला आहे.
‘सेंटर फॉर पॉलसी स्टडीज’ या सामाजिक संशोधन केंद्रातर्फे जे. के. बजाज आणि एम. डी. श्रीनिवास या लेखकांच्या ‘मेकिंग ऑफ अ हिंदू पेट्रियॉट- बॅकग्राउंड ऑफ गांधीजीज हिंद स्वराज’ या पुस्तकाचे प्रकाशन मोहन भागवत यांच्या हस्ते पार पडले.
या पुस्तक प्रकाशनावेळी भागवत म्हणाले की, हिंदू असेल तर तो देशभक्त असायलाच हवा. देशभक्त असणे हे हिंदूंच्या नसानसात भिनलेले असते. माझी देशभक्ती माझ्या धर्मातून येते.
….that adherents of one religion are automatically issued patriotism certificates while others have to spend their lives proving that even they have the right to exist here & call themselves Indians [2/2]
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) January 1, 2021
भागवत यांच्या वक्तव्यानंतर ओवैसी यांनी ट्विट करत सवाल केला आहे. गांधींजींचा हत्यारा गोडसेबाबत काय मत आहे? नेली नरसंहार, 1984 च्या शीख विरोधी आणि 2002 गुजरात नरसंहारसाठी जबाबदार लोकांबाबत बाबत काय मत? याचे भागवत उत्तर देतील का ?, असा सवाल ओवैसींनी केला आहे.
धर्मातील भेदभावाशिवाय अधिकतर भारतीय देशभक्त आहेत. ही फक्त आरएसएस संदर्भहिन विचारधारा असू शकते जी एका धर्माच्या लोकांना आपोआप देशभक्तीचे सर्टिफिकेट देत आहे. तर बाकी लोकांना आपलं जीवन देशभक्ती सिद्ध करण्यात घालवावं लागतं, असेही म्हणत त्यांनी संघावर निशाणा साधला.