धुळे : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार घोषीत झाल्यानंतर आता महायुतीत वाद निर्माण होत असल्याचे दिसून येत आहेत. काही ठिकाणी उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे. तर काही ठिकाणी थेट उमेदवारांच्या विरोधात महायुतीतीलच मित्र पक्षाचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करतांना दिसत आहेत. यातच आता धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे.
हेही वाचा…सातारच्या जागेवर शरद पवार यांचा नवा डाव ; माजी मुख्यमंत्र्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार ?
महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला वाळीत टाकले जात असल्याने अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वेगळी भूमिका घेण्याचा इशारा देतानाच धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डाॅ. सुभाष भामरे यांच्या प्रचारात सहभागी होण्यास कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला. राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील यांच्या समोरच हे नाराजी नाट्य घडले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी येथे राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित आढावा बैठकीत महायुतीतील विसंवाद उघड झाला.
हेही वाचा…वैद्यकीय क्षेत्रात देशाची प्रगती ; म्हणून मोदींना साथ ! सोलापूरमधील डॉक्टरांच्या भावना : महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी साधला संवाद
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे उमेदवार खा. डॉ. सुभाष भामरे यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यक्रमांमध्ये डावलले जात असल्याचा आरोप केला. खासदार पत्र देऊन आमची कामे रद्द करतात. स्वतःचे महत्व टिकवण्यासाठी आम्हाला डावलले जाते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेच पाहिजेत, परंतु महायुतीत आम्हाला वाळीत टाकले जात असेल तर वेगळी भूमिका घ्यावी लागेल, असे इशारा संतप्त कार्यकर्त्यांनी दिला.
मंत्री पाटील यांनी कार्यकर्त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. खासदार भामरे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आल्याने भाजपमधील उमेदवारीसाठी इच्छुक असलेले अनेक जण नाराज आहेत. पक्षांतंर्गत नाराजीला तोंड देत असतानाच भामरे यांना आता मित्रपक्षांच्या रोषालाही तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे दिसत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न अजूनही तसाच, दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडेतीन तास बैठक
हेही वाचा…हिंदुत्वाची धगधगती मशाल असलेल्या ‘पतित पावन संघटने’चा मोहोळांना पाठिंबा
हेही वाचा…नवनीत राणांना अजितदादांच्या नेत्याचा विरोध, थेट कारवाई करण्याचा दिला इशारा
हेही वाचा…राजकीय गणितं सांगताहेत, पुण्यात धंगेकरांपेक्षा मुरलीधर मोहोळच वरचढ
हेही वाचा…शरद पवारांच्या निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा विदर्भातून होणार, अमर काळे यांच्या रॅलीत सहभागी होणार
हेही वाचा…मोहिते पाटलांचा अमोल कोल्हेंवर जोरदार प्रहार ; ती टिका भोवली, घेतला चांगलाच समाचार