मुंबई : देवेंद्र फडणवीस या सगळ्या आमदारांमध्ये सगळ्यात नशीबवान आहेत. कारण त्यांनी या अडीच वर्षात मुख्यमंत्री पद, विरोधी पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री पद भुषवलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी सगळी महत्वाची खातं भुषवली आहेत असा टोला देखील अजित पवार यांनी लगावला. तसेच त्यांनी एकनाथ शिंदे यांचं देखील त्यांनी अभिनंदन केलं आहे.
आरे मेट्रो कारशेडबाबत आता मनसेचा प्रंचड विरोध; अमित ठाकरेंची सनसनीत पोस्ट
एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. देवेंद्र फडणवीसांनी तीन चार वेळा सतत शिवसैनिक म्हणून उल्लेख केला. हे सारखं सारखं का सांगावं लागतंय. 4 जुलै पर्यंत विश्वासदर्शक ठराव करण्यासाठी मुदत दिली होती. त्याप्रमाणे तुम्ही ते केलं आहे. विरोधी मतदान करून आम्ही आमची भूमिका मांडली. सत्ता येते, सत्ता जाते. ताम्रपट घेऊन कुणीच घेऊन आला नाही. असा इशाराही अजित पवारांनी दिला.
आदित्य ठाकरे पक्षातील घाण गेली म्हणतात, अन् ठाकरे बंडखोर आमदारांना आवाहन करतात
एकनाथ शिंदे यांना भाजपने मागच्या टर्म असताना फक्त रस्ते विकास महामंडळच त्यांच्याकडे का दिलं.? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. नेता मोठा असला की खाती जास्त असतात. हे चंद्रकांत पाटलांना माहित आहेत. शिंदे साहेब सर्वगुणसंपन्न होते, तर छोटसं रस्ते विकास महामंडळ, ज्यांचा जनतेशी संबंधच नव्हता. असं असताना त्यांनी दुसरं कुठलं खातं का नाही दिलं? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
ब्रिजभूषण सिंहांकडून शरद पवार ‘चितपट’; महाराष्ट्र कुस्ती परिषद बरखास्त
बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा झाला. भुजबळ साहेबही 10 आमदार घेऊन बाहेर गेले, त्यानंतर एकही आमदार निवडून आला नाही. राणेसाहेबांच्या नंतरही किती आमदार निवडून आले. याचंही आत्मचिंतन प्रत्येकांनं केलं पाहिजे. संदीपानजी मिरच्या झोंबल्या पाहिजे असा टोला देखील त्यांनी लगावला. तसेच 40 आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होते आणि 106 आमदार असलेली उपमुख्यमंत्री होते, यात नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे. असंही ते म्हणाले.
Read also
- “मी पुन्हा आलो पण येतांना एकनाथ शिंदेंना घेऊन आलो”
- एकनाथ शिंदेंकडील लोकं इडीमुळेच आमच्याकडे आलेत; देवेंद्र फडणवीस
- शिंदे सरकारने बहुमत जिंकलं; भाजप शिंदे गटाला 164 तर दोन आमदार तटस्थ
- राहुल नार्वेकर देशातील तरूण विधानसभा अध्यक्ष; देवेंद्र फडणवीस
- “शिवसेनेचा कार्यकर्ता 20 रुपयांचा वडापाव खावून प्रचार करतो”; बंडखोर आमदाराचं वक्तव्य