मुंबई : सभागृहात राहुन बहुमत चाचणीचा प्रस्ताव मंजूर करण्यात अदृश्य हात आहेत. त्यांचे देखील आम्ही आभार मानतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वारदर्शक ठराव जिंकल्यानंतर भाषण केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानभवनात बहुमत चाचणी सिद्ध करून शिंदे सरकार सरकार टिकवलं आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून 164 आमदारांनी मतदान केलं तर महाविकास आघाडीकडून 99 आमदारांनी मतदान केलं आहे.
आदित्य ठाकरे पक्षातील घाण गेली म्हणतात, अन् ठाकरे बंडखोर आमदारांना आवाहन करतात
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदर दिघेसाहेबांच्या प्रभावामुळे 1980 मध्ये शिवसेनेत सक्रिय झाले. शाखाप्रमुखापासून ते वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत ते मुख्यमंत्री झाले. 1984 मध्ये किसन नगर शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर दिघेसाहेबांच्या नेतृत्वात अनेक आंदोलने शिंदेंनी सहभाग घेतला. असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ब्रिजभूषण सिंहांकडून शरद पवार ‘चितपट’; महाराष्ट्र कुस्ती परिषद बरखास्त
जेव्हा नागपुर-मुंबई समृद्धी महामार्गाची संकल्पना ही मी मांडली, त्यांना घेऊन बसलो, त्यांना सांगितलं की माझी इच्छा आहे की हा महामार्ग व्हावा. तिथे प्रत्यक्ष ग्राऊंटवर जाऊन ज्या व्यक्तीनं तिथल्या समस्या सोडवल्या. तिथले अडथळे दुर केले. ज्या व्यक्तीनं यात सातत्यानं काम केलं, त्या व्यक्तीचं नाव एकनाथ शिंदे. आरोग्यमंत्री म्हणूनही त्यांनी अतिशय़ उत्तम काम एकनाथ शिंदे यांनी केलं. एकनाथ शिंदे यांच्याकडील लोकं इडीमुळेच आमच्याकडे आलीत. परंतु इडी म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असंही त्यांनी स्पष्टीकरण दिले.
“कधी शिवबंधन तर कधी शपथा आणि आता काय ते प्रतिज्ञापत्र”
ज्यावेळी मी म्हटलं होतं. की मी पुन्हा येईन, त्यावेळी माझी खुप टिंगळटवाळी केली. मी आलो आहे. त्यामुळे कमी बोलायचं आणि काम अधिक करायचं असं आम्ही दाखवून दिलं आहे. असंही ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यावर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा खुप मोठा प्रभाव होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा प्रवास राहिला आहे. ज्या व्यक्तीमध्ये कर्तृत्व असतंय त्यांना पद महत्वाचं नसतं. एकनाथ शिंदे यांचं अनेक वेळा पंख छाटण्याचे देखील प्रयत्न केले गेले आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Read also
- एकनाथ शिंदेंकडील लोकं इडीमुळेच आमच्याकडे आलेत; देवेंद्र फडणवीस
- शिंदे सरकारने बहुमत जिंकलं; भाजप शिंदे गटाला 164 तर दोन आमदार तटस्थ
- राहुल नार्वेकर देशातील तरूण विधानसभा अध्यक्ष; देवेंद्र फडणवीस
- “शिवसेनेचा कार्यकर्ता 20 रुपयांचा वडापाव खावून प्रचार करतो”; बंडखोर आमदाराचं वक्तव्य
- आरे मेट्रो कारशेडबाबत आता मनसेचा प्रंचड विरोध; अमित ठाकरेंची सनसनीत पोस्ट