मावळ : मागील काही दिवसांपासून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुणे जिल्हा बँकेवर निर्विवाद सत्ता येणार असं बोललं जात असताना आता भाजपने पुणे जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का देत मुसंडी मारली आहे.
झुंड़ मे तो सुअर आते है; पोस्टरबाजी करत राणे समर्थकांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरणाऱ्या पुणे जिल्हा बँकेच्या ‘क’ वर्ग सहकारी बँक आणि पतसंस्था गटात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश घुले यांचा १४ मतांनी पराभव करीत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात त्यांना जाऊन थेट धक्का देत भाजपचा झेंडा रोवण्याचे काम केले आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रदीप कंद यांच्या जिल्हा बँक निवडणुकीतील विजयाने साम, दाम , दंड, भेद, मदमस्त सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या पालकमंत्री अजित पवार यांना आपल्या होम ग्राउंडवर जबरदस्त धक्का बसला असून आता या राभवाने त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असे आवाहन भाजप नेते व माजी मंत्री बाळा भेगडे यांनी केले आहे.
पुणे जिल्हा बँकेत प्रदीप कंदांच्या रूपाने भाजपची ऐतिहासिक विजयी सलामी
भेगडे म्हणाले की कंद यांचा पराभव करण्यासाठी अजित पवारांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. प्रदीप कंद हे गद्दार आहेत, त्यांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन अजित पवारांकडून करण्यात आले होते. जिल्ह्यातील राष्ट्रवादीसह इतरही पक्षातील कार्यकर्त्यांना फोन करून कंद यांचा पराभव करा, त्यांच्या लावा असा आदेशही अजित पवारांनी दिला होता. जिल्ह्यातील पदाधिकारी आता अजितदादांचा आदेश जुमानत नाहीत हेच कंद यांच्या विजयाने अधोरेखित झाले आहे असा टोलाही बाळा भेगडेंनी मारला आहे.
Read also:
- जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने मातृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले – देवेंद्र फडणवीस
- … अनाथांची मातृदेवता हरपली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिंधुताई सपकाळ यांना श्रध्दांजली
- अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचं निधन; पुण्यातील गॅलक्झी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
- सॉरी, सॉरी, सॉरी, सॉरी…; जितेंद्र आव्हाडांनी भाजप नेत्याची मागितली जाहीर माफी
- बारा तासांच्या तुरुंगवासानंतर राष्ट्रवादीच्या आमदाराची सुटका; राजू कारेमोरे म्हणतात…