पुणे : अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 75 वर्षांच्या होत्या, रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी निधन झाले. पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये निधन झाले, महिना भरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
“चंद्रशेखर बावनकुळेंच्या सर्टिफिकेटची मला गरज नाही”, भुजबळांचा पलटवार
सिंधुताईनां लोक प्रेमाने माई म्हणत असे सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी ठेवले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आले.
…तेव्हा शरद पवार म्हणाले होते, मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारला काय? – चंद्रकांत पाटील
मुळच्याच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आलं होतं. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचं लग्न झालं होतं. त्यांच्या आयुष्यातील संघर्षाने त्यांना समाजसेवेकडे वळवलं. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली.
…तर केंद्राच्या नियमांनुसार लॉकडाऊन लागणार; महापौर किशोरी पेडणेकरांचा इशारा
आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत.
सिंधुताईंना मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार खालीलप्रमाणे
- पद्मश्री पुरस्कार (2021)
- डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (2017)
- प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (2015)
- मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (2013)
- महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (2012)
- सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला ‘रिअल हीरो पुरस्कार’ (2012)
- पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार’ (2012)
- महाराष्ट्र शासनाचा ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ (2010)
- दैनिक लोकसत्ताचा ‘सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार’ (2008)
- पुणे विद्यापीठाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’
- आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (1996)
- सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
- राजाई पुरस्कार
- शिवलीला महिला गौरव पुरस्कार
- ‘सामाजिक सहयोगी पुरस्कार’ (1992)
Read also:
- सॉरी, सॉरी, सॉरी, सॉरी…; जितेंद्र आव्हाडांनी भाजप नेत्याची मागितली जाहीर माफी
- बारा तासांच्या तुरुंगवासानंतर राष्ट्रवादीच्या आमदाराची सुटका; राजू कारेमोरे म्हणतात…
- पुणे जिल्हा बँकेत प्रदीप कंदांच्या रूपाने भाजपची ऐतिहासिक विजयी सलामी
- रश्मी ठाकरे मुख्यमंत्रिपद चांगलं सांभाळू शकतील; शिवसेना मंत्र्यांच महत्वपुर्ण विधान
- झुंड़ मे तो सुअर आते है; पोस्टरबाजी करत राणे समर्थकांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं