जामनेर : भाजप नेते गिरीश महाजन यांनी चक्क एका निर्मात्याला सिनेमात काम देण्याची गळच घातली. बरं एकट्यासाठी सिनेमात काम मागतील ते महाजन कसले? महाजन यांनी चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील आणि राधाकृष्ण विखेपाटील यांनाही सिनेमात घेण्याची विनंती निर्मात्याला केली. तर तुमच्यासाठी तर इंग्रजी सिनेमाच बनवावा लागेल असं सांगून निर्मात्यानेही महाजन यांची विकेट घेतली. त्यामुळे एकच हशा पिकला.
जामनेर येथे ‘हलगट’ या सिनेमाच्या पोस्टरचे प्रमोशन माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी या चित्रपटाचे निर्माते बाबुराव घोंगडे यांनाच थेट गळ घातली. अजित पवार, सुधीर मुनगंट्टीवार, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील आणि माझी आता आमदारकीची सहा टर्म झाली आहे. त्यामुळे उद्या पक्षाने जर आम्हाला उमेदवारी दिली नाही तर आम्हाला चित्रपटात भूमिका दया, अशी मागणी महाजन यांनी एका चित्रपट निर्मत्याकडे केली. तीस वर्षे आमदारकीची झाली आहेत. पक्ष एकाच व्यक्तीला किती वेळा संधी देणार? त्यामुळे पक्षाने आम्हाला उमेदवारी नाही दिली आणि आम्ही रिटायर झालो तर भविष्यात आम्हालाही सिनेमात काम करण्याची संधी द्यावी, असं महाजन म्हणाले.
गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर्र केलंय, मेलो तरी ताईची साथ सोडणार नाही – महादेव जानकर
त्यानंतर चित्रपट निर्माते बाबुराव घोंगडे यांनीही षटकार ठोकला. तुमच्यासाठी इंग्रजी चित्रपट काढून त्यात काम करण्याची संधी देईन, असं घोंगडे यांनी म्हणताच एकच खसखस पिकली. जामनेर येथील बाबुराव घोंगडे यांनी ‘हलगट’ याचित्रपटाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात सर्व जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
वेळ आली तर तुमच्यावर जीव सुध्दा ओवाळून टाकेन; पंकजा मुंडेंची भगवानगडावर तुफान फटाकेबाजी
दरम्यान, काही दिवसांपूर्वी महाजन यांनी एका सापाला जीवदान दिलं होतं. महाजन यांनी तब्बल पाच फूट लांबीचा साप पकडला. हा थरार उपस्थितांनी कॅमेरात कैद केला. महाजन हे जळगावातील जामनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. फडणवीस सरकारमध्ये गिरीश महाजन यांनी मंत्रिपदही भूषवलं आहे. फडणवीस सरकार संकटात असताना महाजन अनेकदा ‘संकटमोचक’ ठरले आहेत. मंगळवारी महाजनांनी हीच भूमिका घेत सापालाही जीवदान दिले.
Read Also :
- ड्रग प्रकरणातील फ्लेचर पटेल कोण आहे ? त्याचं NCB च्या एका अधिकाऱ्याशी काय संबंध आहेत? – नवाब मलिक
- अजित पवारांशी संबंधित १८४ कोटी बेहिशेबी मालमत्ता; प्राप्तिकर विभागाच्या छाप्यात धक्कादायक वास्तव उघड
- राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांना पराभूत करा अन् सोन्याचा मुकुट मिळवा; चंद्रकांत पाटलांची भन्नाट ऑफर
- मुखवटा काढा आणि मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा होती हे मान्य करा – देवेंद्र फडणवीस
- सायकल चोरणारे नारायण राणे केंद्रीय मंत्री झाले – शिवसेना नेते गुलाबराव पाटील